भाजप आमदार राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांवर हल्लाबोल; ‘पिल्लू रोहित बाळ’…!

भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांना ‘पिल्लू’ म्हणत त्यांच्या वयावर आणि पवार घराण्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: राज्यामध्ये भाजप आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. रोहित पवारांनी केलेल्या टीकेला राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले असून त्यांनी थेट पवारांच्या वयावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी माझ्या उंचीच्या नेत्यांवर बोलतो, बाकीच्यांवर बोलण्यासाठी पाचवीचा पोरगा प्रवक्ता म्हणून ठेवलाय,” असा खोचक टोला लगावत राऊत यांनी रोहित पवारांना डिवचले आहे.

राऊत यांनी रोहित पवारांचा उल्लेख ‘पिल्लू रोहित बाळ’ असा करत त्यांच्यावर सडकून टीका केली. त्यांना स्वतःला मोठा नेता म्हणवून घेण्याची विकृती लागली असून, रोहित पवारांचे जेवढे वय आहे, तेवढा आपला संघर्ष असल्याचे राऊत म्हणाले. तसेच, सर्वसामान्यांची मुले मोठ्या पदावर गेली की पवार कुटुंबाच्या पोटात दुखते, असा आरोपही त्यांनी केला. रोहित पवारांचे वडील आपला मुलगा चिंचा आणि बोरे विकत होता असे सांगतात, मग आता तो सोने विकतोय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यात अराजकता माजवण्याची सुपारी रोहित पवारांनी घेतली असून ‘उठ सूट मुझे गिनो’ अशी त्यांची अवस्था असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

यावेळी राऊतांनी पवार घराण्याच्या इतिहासावरही बोट ठेवले. आपले घराणे शिवाजी महाराजांच्या सैन्यदलात लढलेले असून रक्त सांडल्याचा आपला इतिहास आहे, असे सांगत त्यांनी पवार घराण्यावर गद्दारीचा आरोप केला. हे घराणे महाराजांसमोरही झुकत नाही आणि कोणाला तरी वाईट वाटेल म्हणून त्यांनी कधी शिवजयंतीही साजरी केली नसल्याचा घणाघात राऊत यांनी केला. मुळात राज्यातील दुष्काळाला पवार कुटुंबच जबाबदार असल्याचा दावा करत, रोहित पवारांनी जास्त शहाणपणा करू नये आणि बार्शीत आपला नाद करू नये, असा थेट इशारा राऊत यांनी दिला.

रोहित पवारांच्या बार्शी दौऱ्याचीही राऊत यांनी खिल्ली उडवली. नौटंकी करण्यासाठीच ते बार्शीत आल्याचे सांगत, त्यांच्या प्रचाराला किती लोक उपस्थित होते, असा सवाल राऊत यांनी केला. सभेला शिक्षक मतदारांचे एकही बोट वर झाले नाही आणि केवळ पाच-सहा पदवीधरांनी हात वर केल्याचे ते म्हणाले. कॉलेजचा परिसर असल्याने तिथे नेहमी दोनशे-तीनशे मुले असतातच, असा चिमटा काढत राऊत यांनी त्यांना कोणत्या शाळेत तरी प्रवेश दिला का, असा उपहासात्मक सवाल उपस्थित केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही