विधान परिषद निवडणूक: कडू-राणा यांची गुप्त बैठक; अमरावती शिक्षक मतदारसंघात समीकरणे बदलणार

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांनी गुप्त बैठक घेतल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.

Published On: 

MLC election secret meeting between Bachchu Kadu and Ravi Rana in Amravati.

अमरावती, 22 ऑक्टोबर: विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस उरला असताना अमरावतीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा हे एकत्र आले आहेत. महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या विजयासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये अमरावतीच्या एका महाविद्यालयात गुप्त बैठक पार पडली आहे.

राज्यात सध्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघासह पुणे, नागपूर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व पाच जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार असून, २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

मतदानाच्या एक दिवस आधीच कडू आणि राणा एकत्र आल्याने अमरावती शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघातून महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याच विजयाची रणनीती ठरवण्यासाठी ही गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे, या निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. एकाच मतदारसंघात मविआचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने आदिती पोहेरे यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने निवडणूक लढवत आहेत. मविआतील या मतभेदामुळे आणि आता बच्चू कडू-रवी राणा यांच्या एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या विजयाची रणनीती ठरवण्यासाठी बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात अमरावतीच्या एका महाविद्यालयात गुप्त बैठक पार पडली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही