शशिकांत पाटील चुयेकर गोकुळचे नवे चेअरमन; सतेज पाटलांनी पाळला शब्द

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत १३ जागा जिंकल्यानंतर सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळत शशिकांत पाटील चुयेकर यांच्या चेअरमनपदावर शिक्कामोर्तब केले आहे.

Published On: 

Gokul Election Shashikant Patil Chuyekar confirmed as Chairman by Satej Patil

प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. महायुतीने प्रचंड ताकद लावूनही सतेज पाटील यांनी एकहाती झुंज देत २५ पैकी १३ जागा जिंकून गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणले. आता सत्ता हाती येताच निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळत पाटील यांनी चेअरमनपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदाची अधिकृत निवडणूक येत्या २९ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. शशिकांत पाटील चुयेकर हे गोकुळचे संस्थापक चेअरमन दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र आहेत. गेल्या वेळीही चेअरमनपदासाठी त्यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र, त्यावेळी अरुण डोंगळे यांनी केलेल्या विश्वासघातकी राजकारणामुळे चुयेकर यांना या पदापासून दूर राहावे लागले होते.

त्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींनंतर नविद मुश्रीफ यांना चेअरमनपद देण्यात आले होते. हाच घटनाक्रम लक्षात ठेवून सतेज पाटील यांनी यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतानाच शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्षपद देण्याची घोषणा केली होती. गेल्या वेळी अध्यक्षपदासाठी त्यांनी आणलेला हार, गुलाल आणि घातलेला मांडव सार्थ ठरवण्यासाठी पुन्हा सत्ता आणून तोच गुलाल उधळणार, असे रणाशिंग पाटील यांनी फुंकले होते. आता सत्ता आल्यामुळे शशिकांत पाटील यांचे चेअरमनपदाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

दुसरीकडे, या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांना ओबीसी गटातून पराभवाला सामोरे जावे लागले. गोकुळसाठी महायुतीचे पॅनेल प्रमुख असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आपल्या मुलाचा पराभव हे ठरवून केलेले षड्यंत्र असल्याची टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदासाठी सतेज पाटील यांनी शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही