मी पुराव्याशिवाय बोलत नाही, शिंदेंनी ५०० कोटींच्या देवाणघेवाणीवर सत्य सांगावे: मनोज जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या ५०० कोटींच्या देवाणघेवाणीच्या आरोपांचा पुनरुच्चार केला असून, यासंदर्भातील सर्व पुरावे देण्याची तयारी दर्शवली आहे.

Published On: 

Manoj Jarange Patil and Ramdas Kadam speaking on recent political allegations

मुंबई, 20 ऑक्टोबर: मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीच्या आरोपांवर आपण ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘माझ्याकडे पुरावे असून मी पुराव्याशिवाय बोलत नाही,’ असा इशारा देत एकनाथ शिंदे यांनी यावर ‘होय किंवा नाही’ असे उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिंदे यांनी सत्य सांगावे, अन्यथा आपण पुरावे देण्यास तयार असल्याचे जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नारायणगडावरील दसरा मेळाव्यात जरांगे (Manoj Jarange) यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये पोहोचल्याचा दावा केला होता. दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये याविषयी चर्चा असल्याचा दाखला देत, शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना माझ्याबद्दल खोटे सांगितले का? माझ्या नावाने भाजपकडून पैसे घेतले असतील, तर ते मला दिले आहेत का? असे सवाल जरांगे यांनी उपस्थित केले आहेत.

या प्रकरणातील सत्य शिंदे यांनी शिवसेनेच्या आजच्या दसरा मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट करावे, असे आव्हान जरांगे यांनी दिले आहे. उपोषणाच्या नवव्या दिवशी आपल्याला ही माहिती समजली असून, माझ्याकडील पुराव्यांमध्ये सर्वकाही असल्याचे ते म्हणाले. भाजप शिंदे साहेबांना संपवत आहे की शिंदे साहेब मला संपवत आहेत, हे स्पष्ट होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. ५०० कोटी रुपये मिळाले असते, तर किमान ४० हजार मराठा तरुणांचे भले झाले असते, असेही जरांगे म्हणाले.

या आरोपांनंतर शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी जरांगे उघडपणे बोलल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यामुळे अधिक स्पष्टता येईल आणि ही कोण माणसे आहेत, हे एकनाथ शिंदेंना समजेल, असे कदम म्हणाले. काहींना शिवसेना आणि भाजपमध्ये तेढ निर्माण करायची असून युतीमध्ये भांडणे लावण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. जरांगे यांनी कोणावर विश्वास ठेवायचा, याचा विचार करावा असा सल्लाही कदम यांनी दिला.

विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही या आरोपांवरून जरांगे यांच्यावर निशाणा साधला. मराठा समाजाचे नेतृत्व करणारे जरांगे अचानक असे आरोप का करत आहेत आणि त्यांचा ‘बोलवता धनी’ कोण आहे? असा सवाल अहिर यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला भरभरून दिले असताना, केवळ राजकीय हेतूने आणि लोकांचे लक्ष वेधण्यासाठी असे सनसनाटी आरोप करणे योग्य नाही, असे सांगत अहिर यांनी या वक्तव्याचा धिक्कार केला. यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा साधेपणाने साजरा करून शेतकऱ्यांना मदत केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या कथित देवाणघेवाणीचा आरोप केला असून, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून हे ५०० कोटी रुपये पोहोचल्याचा दावा त्यांनी केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही