गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांनी मते चोरली; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खळबळजनक आरोप

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी मतचोरी करून १३ संचालक निवडून आणल्याचा खळबळजनक आरोप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Published On: 

Chandrakant Patil making allegations against Satej Patil regarding Gokul elections.

प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केलेला असतानाच, आता गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही मतचोरी झाल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर महायुतीची मते चोरून १३ संचालक निवडून आणल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यास कोल्हापुरातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवून सतेज पाटील यांचा पराभव करण्याचे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

या आरोपाबाबत मतांचे गणित उलगडताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, गोकुळ निवडणुकीसाठी प्रत्येक गावातील मान्यताप्राप्त डेअरी संचालकाने एक ठराव द्यायचा असतो. या निवडणुकीसाठी एकूण ५४०० ठराव अंतिम झाले होते. त्यापैकी महायुतीच्या बाजूने ४४०० तर सतेज पाटील यांच्या बाजूने ९०० ठराव होते. मात्र, महायुतीमधील अंतर्गत वर्चस्वाच्या वादाचा फायदा घेत तसा प्रचार करण्यात आला. परिणामी महायुतीची मते ४४०० वरून थेट २७०० ते २८०० पर्यंत घसरली. या आकडेवारीवरून सतेज पाटील यांनी आमची मते चोरल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, गोकुळ निवडणुकीत विरोधी बाकांवर बसावे लागल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी आता दुष्काळाच्या मदतीवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित राहिलेल्या उर्वरित तालुक्यांचा राज्यातील दुष्काळी यादीत तात्काळ समावेश करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. तसेच, शेतकऱ्यांना केवळ कर्जाचे पुनर्गठन न देता सरसकट पीक कर्जमाफी देण्याची मागणीही त्यांनी दोन दिवसांपूर्वी केली. राज्य शासनाने यावर त्वरित निर्णय न घेतल्यास आपण स्वतः शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू आणि आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी गेले काही दिवस आंदोलन सुरू आहे. गुरुवारी गडहिंग्लज येथे ‘दुष्काळग्रस्त संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली शहरातून काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चात सतेज पाटील सहभागी झाले होते. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील दसरा चौकात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला, या आंदोलनात आमदार सतेज पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही