डिलिमिटेशन विधेयकासाठी भाजपला राष्ट्रवादीचे १५-१६ खासदार हवेत; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांवर लक्ष असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Published On: 

Congress leader Prithviraj Chavan interacting with media

प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. महिला विधेयकाच्या नावाखाली नरेंद्र मोदी सरकारला डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक मंजूर करून घेण्याची घाई झाली आहे. मात्र, या विधेयकासाठी सरकारकडे १५ ते १६ मतांची कमतरता असल्यामुळे भाजपचे राष्ट्रवादीच्या खासदारांवर लक्ष असल्याचा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना चव्हाण म्हणाले की, शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीचा घटक असल्याने त्यांच्या पक्षात काय सुरू आहे, यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. राष्ट्रवादीचे विलीनीकरण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी, या घडामोडींमागे केंद्रातील राजकीय गणित दडलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी दोन ते तीन दिवसांत राष्ट्रवादीच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांच्या वाटचालीबाबत बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, पवारांची राजकीय पार्श्वभूमी नेहमीच डाव्या विचारसरणीकडे झुकणारी आणि फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार मांडणारी राहिली आहे. आमदारांच्या दबावाखाली सत्तेच्या जवळ जायचे का, हा त्यांच्यासमोरील मोठा प्रश्न आहे. मात्र, अशा परिस्थितीत त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास तो वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला निर्णय मानला जाईल, असे चव्हाण यांनी नमूद केले.

शरद पवार यांचा गट एनडीए (NDA) मध्ये जाणार नाही, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. मात्र, एनडीएमध्ये थेट सहभागी न होता राष्ट्रवादीकडून डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. यासोबतच, शिवसेना ज्याप्रमाणे फोडण्यात आली, तसाच प्रयत्न राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी होऊ शकतो आणि भाजप नेते पक्ष फोडण्याची भाषा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि नेतृत्व कोणी करावे, याबाबत राष्ट्रवादीत चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे सत्तेत जाण्यासाठी आमदार व खासदारांकडून दबाव आहे. जर राष्ट्रवादीचे विलीनीकरण होऊन पक्ष एनडीएसोबत गेला, तर देशात हिंदुत्व आणि समता अशा दोनच विचारधारा उरतील आणि याचा परिणाम भारतीय राजकारणासह ‘इंडिया’ आघाडीवरही होईल. दरम्यान, नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाबाबतही लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही