प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर ‘वेट अँड वॉच 3.0’ असा मजकूर लिहिण्यात आला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर 3’ च्या चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांना दुसरा सर्वात मोठा धक्का बसला होता. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी त्यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या खासदारांचा पक्षप्रवेश पार पडला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, तर महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांना मोठा फटका बसला. या निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण ९ खासदार निवडून आले होते. मात्र, त्यानंतर त्यातील ६ खासदार फोडण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले.
या सहा खासदारांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाचे संख्याबळ वाढले असून, राज्यात महायुतीमध्ये आता सर्वाधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ‘वेट अँड वॉच 3.0’ मजकूर असलेला शिंदे यांचा फोटो समोर आल्याने ते पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर 3.0’ राबवणार का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- १६ तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? पोस्टरने उडाली खळबळ
- उस्मान ख्वाजाच्या ‘सँडपेपरगेट’ दाव्यांवर पॅट कमिन्सने सोडले मौन; आरोप ‘पूर्णपणे बकवास’ असल्याचे मत
- रोहित शर्मा आणि इशान किशनच्या चुकीमुळे विल यंगला दोन जीवदान, आकिब नबी संतापला








