प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: अमेरिकेत एक मोठी धक्कादायक घटना घडली असून, देशातील सर्व विमान उड्डाणे अचानक थांबवण्यात आली आहेत. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) दिलेल्या निर्देशानुसार देशभरातील विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. एकाच वेळी ७ हजारांहून अधिक विमानांवर याचा परिणाम झाला असून, हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडल्याने सर्वत्र मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
ही अभूतपूर्व परिस्थिती नेटवर्क राऊटरमध्ये झालेल्या बिघाडामुळे उद्भवल्याचे समोर आले आहे. या तांत्रिक समस्येचा फटका संपूर्ण अमेरिकेतील हवाई वाहतुकीला बसला. जोपर्यंत पुढील सूचना मिळत नाही, तोपर्यंत सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्यात यावे, असा अलर्ट एफएएने जारी केला आहे. अचानक सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांनी ‘एक्स’वर (X) पोस्ट शेअर करत अधिकृत माहिती दिली. सर्व ‘एअर रूट ट्रॅफिक कंट्रोल सेंटर्स’वर परिणाम करणाऱ्या समस्येमुळे एफएएने संपूर्ण देशभरातील विमानतळांवरून उड्डाणे थांबवण्याचा आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एफएएचे तंत्रज्ञ या समस्येचा सखोल तपास करत असून, अधिक माहिती मिळताच ती अपडेट केली जाईल, असेही डफी यांनी सांगितले.
सध्या अमेरिकेतील विमानसेवा पूर्णपणे कोलमडली असून, विमानतळांवर प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विमानांची उड्डाणे पुन्हा कधी सुरू होणार, याचे कोणतेही उत्तर सध्यातरी विमान कंपन्यांकडे नाही. नक्की काय झाले याचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. अमेरिकेच्या हवाई वाहतुकीवर पहिल्यांदाच एवढा मोठा परिणाम झाल्याचे बोलले जात असून, या संपूर्ण परिस्थितीकडे जगाचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मीही राष्ट्रवादीत काम केलंय, बरंच काही बोलू शकतो; शिंदेसेनेच्या मंत्र्याचा सुनील तटकरेंना सूचक इशारा
- अजित पवारांच्या घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा ‘मफलरवाला नेता’ कोण? १६ नोव्हेंबरला फुटणार मोठा बॉम्ब
- चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांवर गोकुळमध्ये ‘मतचोरी’ केल्याचा गंभीर आरोप; मतांचे गणितही मांडले








