प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: यंदा देशामध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नसून, वर्ष संपत आले तरी हवामानाचा लपंडाव सुरूच आहे. अशातच आता ‘टॉमस’ नावाच्या आणखी एका नव्या चक्रीवादळाचे मोठे संकट समोर आले आहे. फिलिपिन्सच्या ‘PAGASA’ या हवामान संस्थेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, या संभाव्य वादळामुळे सलग १० दिवस मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, २०२६ हे वर्ष संपण्यापूर्वी ‘टॉमस’ चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. जसजसा वेळ जाईल तसतसे हे वादळ अधिक आक्रमक होऊ शकते. वातावरणातील ही साखळी पूर्ण ताकदीने तयार झाल्यास, वाऱ्याचा वेग ताशी १८४ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्र आणि मानवी वस्ती असलेल्या जमिनीवर सुमारे १० दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस हजेरी लावेल, ज्यामुळे मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.
या संभाव्य चक्रीवादळामुळे पॅसिफिक महासागराच्या आसपासच्या किनारपट्टीला थेट धोका आहे. डिंसेंबरच्या अखेरीस येऊ घातलेल्या या वादळाचे नाव संस्थेने आधीच निश्चित केले आहे. या वादळाचा सर्वाधिक तडाखा उत्तर लुझोन आणि पूर्व किनारपट्टीतील बेटांना बसू शकत असल्याने, या प्रदेशातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे चक्रीवादळ मानवी वस्तीत नेमके कधी धडकेल आणि किती विध्वंस करेल, याची कोणतीही निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारणपणे अशी वादळे तयार झाल्यानंतर कमकुवत होण्यासाठी ५ ते १० दिवसांचा कालावधी लागतो.
शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, जर ‘टॉमस’ चक्रीवादळाने निरीक्षण क्षेत्रात प्रवेश करून जमिनीकडे मोर्चा वळवला, तर त्याचा किनारपट्टीवरील थेट प्रभाव १ ते ४ दिवस टिकू शकतो. तसेच, ते किनारपट्टीवर धडकल्यास अतिवृष्टी आणि सोसाट्यांच्या वाऱ्यांचा सर्वात धोकादायक टप्पा २ ते ३ दिवस राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात १३ नोव्हेंबरच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. तसेच, काही भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- जास्वंदाच्या तेलाने थांबेल केस गळती आणि केसांना मिळेल पोषण; जाणून घ्या तेल बनवण्याची सोपी कृती
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली







