भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; 5 ओळीचं पत्र अन्…

बिसौली मतदारसंघाचे माजी आमदार कुशाग्र सागर यांनी ११ वर्षांनंतर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अपेक्षित सन्मान न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

Published On: 

Kushagra Sagar resigns from BJP in Uttar Pradesh.

प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधील यशानंतर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांचा प्रवेश वाढला आहे. मात्र, यामुळे मूळ नेत्यांमध्ये नाराजी वाढू लागली असून, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. बदायूं जिल्ह्यातील बिसौली मतदारसंघाचे माजी आमदार कुशाग्र सागर यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भाजपने एनडीएच्या साथीने केंद्रात सत्ता स्थापन केली. यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले स्पष्ट बहुमत, तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा केलेला पराभव आणि आसाममध्ये मिळवलेली सत्ता, या यशाची मालिका सुरूच होती. यामुळेच इंडिया आघाडीतील अनेक बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरली.

मात्र, बाहेरून येणाऱ्या नेत्यांमुळे भाजपच्या जुन्या नेत्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार कुशाग्र सागर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला आहे.

आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना सागर यांनी म्हटले आहे की, “मी पक्षात प्रदीर्घ काळ काम केले, परंतु मला माझ्या अपेक्षेनुसार सन्मान मिळाला नाही. त्यामुळे कुठेतरी मनाला वेदना झाल्या. जेव्हा आपण एखाद्या पक्षात ११ वर्षे काम करतो, तेव्हा त्या पक्षासोबत एक भावनात्मक नाते तयार होते. त्यामुळे भाजप सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता.”

“माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी होत्या, परंतु तरीदेखील मी पूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले. माझ्या पूर्ण ताकदीने पक्षाचे संघटन कसे वाढेल यासाठी प्रयत्न केले आणि भाजपलाच आपले कुटुंब मानले. ज्यांनी मला सहकार्य केले, त्या सर्वांचे मी आभार मानतो,” असेही कुशाग्र सागर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सागर आता समाजवादी पक्षात (सपा) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यातील बिसौली मतदारसंघाचे माजी आमदार कुशाग्र सागर यांनी भाजपच्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही