विधान परिषद निवडणूक: सोलापुरात भाजप नेते दिलीप मानेंचा ‘पॉवर गेम’; १७०० मतदारांसह केले सामूहिक मतदान

विधान परिषदेच्या ५ जागांसाठी आज मतदान पार पडत असून, सोलापुरात भाजप नेते दिलीप माने यांनी आपल्या संस्थेतील १७०० मतदारांसह सामूहिक मतदान केले.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: महाराष्ट्र विधान परिषदेच्या २०२६ च्या निवडणुकीअंतर्गत तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी आज (शुक्रवार, २३ ऑक्टोबर) मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत सोलापूरमध्ये भाजप नेते दिलीप माने यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माने यांनी आपल्या ‘बीएमआयटी’ (BMIT) शिक्षण संस्थेतील तब्बल १७०० मतदारांना सोबत घेऊन सामूहिक मतदान केले. पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी ते संस्थेतील या सर्व मतदारांना घेऊन थेट मतदान केंद्रावर पोहोचले.

राज्यातील या पाच जागांसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकूण १८२ उमेदवार असून, १० लाख ६८ हजार ७२ मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. या प्रक्रियेसाठी प्रशासनाने २ हजार ४१९ मतदान केंद्रे उभारली आहेत. महायुतीमधील बंडखोरी आणि पक्षांतर्गत नाराजीमुळे अधिकृत उमेदवारांची धास्ती वाढली आहे, तर महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होत असल्याने या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीच्या पुणे विभाग पदवीधरच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. “पदवीधर हा या निवडणुकीचा केंद्रबिंदू असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सुजाण मतदार योग्य निर्णय घेतील. मी सुरुवातीलाच पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला होता. कोल्हापूरमध्ये जसा गुलाल उधळला गेला, तसाच तो २७ तारखेला पुन्हा उधळला जाईल,” असा दावा त्यांनी केला. सर्वांनी सकाळीच मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज मतदानाच्या दिवशी त्यांनी देवदर्शन घेत सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. “शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा, अशी माझी इच्छा आहे,” असे सानप म्हणाले. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा शिक्षकांचा आमदार होईल, अशी आशा त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

ही निवडणूक पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन पदवीधर, तर अमरावती आणि पुणे या दोन शिक्षक मतदारसंघांसाठी होत आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधरसाठी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत मतदान होत आहे. तसेच, छत्रपती संभाजीनगर पदवीधरसाठी ८ जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया सुरू आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिम येथे, तर नागपूर पदवीधरसाठी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली येथे मतदान पार पडत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

भाजप नेते दिलीप माने यांनी आपल्या 'बीएमआयटी' (BMIT) शिक्षण संस्थेतील तब्बल १७०० मतदारांना सोबत घेऊन सामूहिक मतदान केले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही