प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: राज्य सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांची अग्रीम दुष्काळी मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. “नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या एका चहापानाचा खर्चही यापेक्षा कितीतरी मोठा आहे,” असा संताप व्यक्त करत त्यांनी या मदतीला अन्नदात्याची क्रूर थट्टा म्हटले आहे.
‘एक्स’ वर पोस्ट करत रोहित पवार यांनी सरकारच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, “आज शेतीचा मशागत खर्चच हेक्टरी ३० ते ५० हजार रुपयांवर गेला आहे. अशा परिस्थितीत जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी करणारे सरकार ५ हजार रुपयांचे चॉकलेट शेतकऱ्यांच्या हातावर टेकवत असेल, तर सरकारला लाज कशी वाटत नाही?” दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या बळीराजाचा हा अपमान असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी केली. त्यापैकी अग्रीम रक्कम म्हणून सरकारने शेतकऱ्यांना ३० ते ३५ हजार रुपये आणि शेतमजुरांना प्रति कुटुंब १० हजार रुपये तातडीने द्यावेत, अशी त्यांची भूमिका आहे. ही मदत न दिल्यास लोक नेत्यांना आणि मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाहीत तसेच गावातही फिरू देणार नाहीत, असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अग्रीम मदत जाहीर केली होती. या योजनेसाठी राज्य सरकारने ६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अंदाजे १.२५ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दिवाळीपूर्वीच ही ५ हजार रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंचा धाक आहे का? MPSC कडून कागदपत्रे नष्ट करण्याच्या घाईवरून रोहित पवारांचा थेट इशारा
- ‘सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाहीत’; पहिल्याच ऑडिशनला सोनाली कुलकर्णीला रंगावरून हिणवलं
- आंदोलनात सहभागी झाल्याने इमरान खानला देश सोडण्याची नोटीस, संजय राऊतांचा संताप; म्हणाले- अक्षय कुमारला का सांगत नाही?
Quick Answers
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांची अग्रीम दुष्काळी मदत जाहीर केली आहे.
रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे. यापैकी अग्रीम रक्कम म्हणून शेतकऱ्यांना ३० ते ३५ हजार रुपये आणि शेतमजुरांना प्रति कुटुंब १० हजार रुपये तातडीने देण्याची त्यांची मागणी आहे.
या योजनेसाठी राज्य सरकारने ६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, ३४ जिल्ह्यांमधील ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अंदाजे १.२५ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








