‘सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाहीत’; पहिल्याच ऑडिशनला सोनाली कुलकर्णीला रंगावरून हिणवलं

सोनाली कुलकर्णीने ‘बॉलिवूड बबल’च्या पॉडकास्टमध्ये आपल्या पहिल्या ऑडिशनचा प्रसंग शेअर केला, जिथे तिला सावळ्या रंगावरून एका महिलेने हिणवले होते.

Published On: 

Sonali Kulkarni reveals facing colourism and being mocked for skin colour in early career

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या ‘द पॅराडाइज’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात तिने अभिनेता नानीच्या आईची, म्हणजेच समक्काची भूमिका साकारली असून, तिच्या कामाचे विशेष कौतुक होत आहे. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने नुकतेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पापाराझींसोबत केक कापून यश साजरे केले. याच यशाच्या पार्श्वभूमीवर सोनालीने ‘बॉलिवूड बबल’च्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावत एका कटू प्रसंगाचा खुलासा केला. लहान असताना तिला तिच्या त्वचेच्या रंगावरून कशा प्रकारे हिणवले गेले होते, याचा अनुभव तिने या मुलाखतीत सांगितला.

आपल्या पहिल्या ऑडिशनची आठवण सांगताना सोनाली म्हणाली की, सावळ्या मुलींनी कॅमेऱ्यासमोरचे रोल करू नयेत, असा एक सर्वसाधारण समज त्यावेळी होता. पुण्यात ऑडिशनसाठी गेली असताना एका महिलेने तिला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली होती. “तू इथे का आली आहेस? आपला चेहरा आरशात बघत जा, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाहीत,” असे त्या महिलेने सोनालीला सुनावले होते. कधी कधी आजूबाजूची लोक खूप क्रूर वागतात, असे सांगत सोनालीने या प्रकारामुळे आपण खूप दुखावले गेलो होतो, असे स्पष्ट केले.

आपल्या कुटुंबाकडे फारसे पैसे नव्हते, पण केवळ प्रेम होते, असे सांगताना या प्रसंगामुळे आपल्याला खूप अपमानित वाटल्याचे तिने सांगितले. “मला तिथून पळून जावेसे वाटले. माता सीतेप्रमाणे मला पृथ्वीने मिठीत घ्यावे, असे मला वाटून गेले,” या शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, त्यानंतर काही वेळातच ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांच्याशी तिची भेट झाली. त्यांनी तिचे नाव विचारून तिच्या कामाबद्दल जाणून घेण्यात रस दाखवला. त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे सोनालीला दिलासा मिळाला आणि काही काळासाठी ती तो अपमान विसरून गेली.

या पॉडकास्टमध्ये सौंदर्याच्या संकल्पनेवरही चर्चा झाली. लहानपणी आपले नाक लहान आहे आणि रंग गोरा नसून गव्हाळ आहे, असा न्यूनगंड तिला होता. इतरांना कॉम्प्लेक्स देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मानणारे काही लोक समाजात असतात, असे ती म्हणाली. मात्र, कालांतराने प्रत्येक व्यक्ती जन्मतः सुंदर असते, याची तिला जाणीव झाली. “त्यावेळी त्या मॅडम मला काय म्हणाल्या, हे मी उघडपणे कोणाला सांगू शकले नाही. मात्र, त्यानंतर मी स्वतःवर मेहनत घेतली. आज मी हे मान्य करू शकते की मी खूप सुंदर आहे, कारण माझा दृष्टिकोनच खूप सुंदर आहे,” असा सकारात्मक विचार सोनालीने मांडला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही