प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिने बॉलिवूडमधील ‘हिंदूफोबिया’वर स्पष्ट भाष्य केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टी पाश्चात्य संस्कृतीचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण करत असून हिंदू चालीरीती स्वीकारण्यास येथील लोकांना आजही संकोच वाटतो, असे वादग्रस्त विधान तिने केले आहे. रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने हा दावा केला.
अध्यात्म, ज्योतिष आणि अंकशास्त्रावर दृढ विश्वास असणाऱ्या एकताने धर्माबाबत लोकांच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले. ती म्हणाली, “मी कॅमेऱ्यासमोर हे उघडपणे सांगतेय. चित्रपटांनी चांगले पैसे कमावणे ठीक आहे; मात्र आपल्या चित्रपटसृष्टीत इतक्या मोठ्या प्रमाणावर ‘हिंदूफोबिया’ आहे की, ॲनिमेटेड चित्रपटांबाबत आपण निश्चिंत असतो, परंतु पौराणिक आणि लोककथांबद्दल बोलताना मात्र आपल्याला संकोच वाटतो.”
पौराणिक कथा लोकांसमोर उघडपणे आणून त्या स्वीकारायला लावण्याची आपली इच्छा असल्याचे सांगत, लोक आता पूर्वीपेक्षा अधिक स्वीकारणारे झाल्याचे निरीक्षण तिने नोंदवले. धार्मिक ओळखीवरून येणाऱ्या अडचणींबाबत खंत व्यक्त करत एकता म्हणाली, “आजच्या काळातही आपली धार्मिक ओळख उघडपणे दाखवणे आणि टिळा लावणे किती कठीण आहे, हे मी सांगू शकत नाही. एकदा तर मंदिरातून थेट क्लबमध्ये गेल्यामुळे माझ्यावर टीका झाली होती.” सामाजिक चालीरीती आणि धार्मिक श्रद्धा या दोन गोष्टी एकत्र का असू शकत नाहीत, असा सवालही तिने उपस्थित केला.
सध्या एकता कपूर तिच्या निर्मितीखालील ‘द वन’ या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाची कथा बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील बिहटा येथील माँ वन देवी मंदिराच्या लोककथेवर आधारित आहे. याव्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘विवान’ या चित्रपटामुळेही एकता कपूर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs WI: श्रेयस अय्यर संतापला, पराभवानंतर ६ गोलंदाजांवर फोडलं खापर
- नाना पाटेकरांचे शेवटचे शब्द मनाला बोचतात; शोकसभेत आठवणी सांगताना तुकाराम मुंढे भावूक
- ‘मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण OCI कार्डधारक इम्रान खान…’; अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Quick Answers
भारतीय चित्रपटसृष्टी पाश्चात्य संस्कृतीचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण करत असून, हिंदू चालीरीती स्वीकारण्यास येथील लोकांना आजही संकोच वाटतो, असे विधान एकता कपूरने केले आहे. तसेच आपल्या चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणावर 'हिंदूफोबिया' असल्याचा दावाही तिने केला.
धार्मिक ओळख उघडपणे दाखवणे आणि टिळा लावणे कठीण असल्याचे सांगताना, एकदा मंदिरातून थेट क्लबमध्ये गेल्यामुळे आपल्यावर टीका झाली होती, अशी खंत एकता कपूरने व्यक्त केली.
‘द वन’ या चित्रपटाची कथा बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील बिहटा येथील 'माँ वन देवी मंदिराच्या' लोककथेवर आधारित आहे.
दीपक कुमार मिश्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, त्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








