‘मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण OCI कार्डधारक इम्रान खान…’; अभिजित दिपकेंचा हल्लाबोल

अभिनेता इम्रान खानला देश सोडण्याच्या नोटिशीवरून अभिजित दिपकेंनी अमेरिकन गायिका मेरी मिल्बेन यांच्या दाव्याचा संदर्भ देत जोरदार टीका केली आहे.

Published On: 

Abhijeet Dipke criticizes PM Narendra Modi on instagram video

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांनी २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. या कारवाईवरून सीजेपीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘अमेरिकन गायिका मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूने बोलू शकते, मात्र ओसीआय (OCI) कार्डधारक असूनही इम्रान खान भाजपविरोधात बोलू शकत नाही,’ अशी सडकून टीका दिपके यांनी केली आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होता. यावेळी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले होते. भारतीय नागरिक नसतानाही अशा आंदोलनात सहभागी झाल्याने त्याच्यावर इमिग्रेशन कायद्यातील कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. परदेशी नागरिकत्व आणि इमिग्रेशन कायद्याच्या अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी मेरी मिल्बेन यांनी दावा केला होता की, सीजेपीला भारतात आंदोलने करण्यासाठी अमेरिकेकडून निधी मिळत आहे. भारतीय तरुणांनी या शक्तींविरुद्ध एकत्र येत शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. तसेच, दिपके यांनी पंतप्रधानांसोबत बसून भारताला पुढे नेण्याबाबत चर्चा करावी, असा सल्ला मिल्बेन यांनी दिला होता.

मिल्बेन यांच्या या दाव्यावर पलटवार करताना दिपके म्हणाले होते की, “परदेशी लोकांनी आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार परदेशी लोकांना कोणी दिला? आम्ही आमचे प्रश्न स्वतः हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहोत.” याच वादाचा धागा पकडत आता दिपके यांनी इम्रान खानच्या कारवाईवर भाष्य केले आहे.

दरम्यान, ओसीआय (Overseas Citizen of India) कार्ड म्हणजे भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकाला भारत सरकारने दिलेले विशेष कार्ड असते. ज्या व्यक्ती मूळ भारतीय वंशाच्या आहेत पण त्यांनी परदेशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे, अशा पात्र व्यक्तींना हे कार्ड मिळते. यामुळे त्यांना भारतात दीर्घकाळ राहण्याची आणि स्वतंत्र व्हिसाशिवाय वारंवार ये-जा करण्याची सुविधा मिळते.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मुंबई पोलिसांनी अभिनेता इम्रान खान याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही