आंदोलनात सहभागी झाल्याने इमरान खानला देश सोडण्याची नोटीस, संजय राऊतांचा संताप; म्हणाले- अक्षय कुमारला का सांगत नाही?

सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल इमरान खानला देश सोडण्याची नोटीस मिळाल्यानंतर, संजय राऊत यांनी अक्षय कुमारचा संदर्भ देत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Published On: 

Sanjay Raut on PM Narendra Modi

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान याला आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. इमरान खानने आंदोलनात सहभाग घेत तरुणांची बाजू मांडली म्हणून त्याला देश सोडण्याची नोटीस दिली जाते. मग परदेशी नागरिक असलेल्या अक्षय कुमार, शेख हसीना यांना असे का सांगितले जात नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. बॉलिवूडमधील अनेक कलाकार विदेशी किंवा अनिवासी भारतीय असल्याचे सांगत, हे सरकार घाबरलेले असल्याचा घणाघात त्यांनी केला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जगदीप धनकड यांना उपराष्ट्रपती पदावरून तडकाफडकी हटवल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. असे असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) धनकड यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. यावरून आरएसएस आणि मोदी-शाह यांच्यात मोठी दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. आरएसएसला या दोघांनाही दूर करायचे असून हा त्याचाच पुरावा असल्याचे राऊत म्हणाले.

इंडिया आघाडीने ज्ञानेश कुमार यांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होत आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ही आमची रस्त्यावरची लढाई आहे. राहुल गांधी आणि आम्ही सर्वजण साडेपाच ते सहा तास दिल्लीच्या रस्त्यांवरून प्रवास करून सर्वोच्च न्यायालयात पोहोचलो आणि याचिका दाखल केली. देशात बाहेर काय चालले आहे, जनतेत किती असंतोष खदखदत आहे, याची सर्वोच्च न्यायालयाला जाणीव आहे. त्यामुळे आमचे म्हणणे न्यायालय नक्की ऐकून घेईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

जंतर-मंतर येथे तिरंगा फडकवल्याबद्दल सीजेपीच्या तीन नेत्यांना अटक करण्यात आली आहे. देशाच्या प्रश्नांचे प्रतिबिंब राजधानीत उमटत असून, ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकारांनी दिल्लीत जाणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी अंकिता भंडारी हत्या प्रकरणावरूनही भाजपला घेरले. एका रिसॉर्टवर झालेल्या या खुनात भाजपचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांचे नाव आले होते. त्यांची चौकशी सुरू असतानाच मोदी-शाह यांनी त्यांना सिक्कीमचे राज्यपाल बनवून संरक्षण दिले आणि चौकशी बंद केली. एका बलात्कारी पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठीच ही नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

काल राहुल गांधी यांनी अंकिताच्या आई-वडिलांना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी चर्चा केली आणि इंडिया गेटवर काही काळ आंदोलन केले. मात्र, पहाटे चार वाजता अमित शाह यांच्या पोलिसांनी त्या पीडित माता-पित्यांनाच अटक केल्याची माहिती राऊत यांनी दिली.

राम मंदिर दानपेटीप्रमाणेच आता काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोन्याची चोरी झाली आहे. यावरूनही राऊत यांनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. नरेंद्र मोदी हे काशीचे खासदार आहेत. पूर्वी मोगलांनी हिंदू मंदिरांचे कळस कापून नेले आणि सोमनाथ मंदिर अनेकदा लुटले. आता मोदींच्या काळात आणि हिंदू राज्यात त्यांचेच लोक राम मंदिराची दानपेटी आणि सोन्याचे कळस चोरत आहेत. मोदी आपण कुठे आहात? चोर कोण आहेत यावर लक्ष ठेवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही