सुरतला गेलेल्या ३ आमदारांना मारण्याचा कट; इंजेक्शन, ट्रकचा वापर… संजय राऊतांचा मोठा दावा

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराच्या जिवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट नुकताच केला होता.

Published On: 

Sanjay Raut speaking to media making claims about Surat MLAs

प्रतिनिधी, 24 नोव्हेंबर: शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराच्या जिवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट नुकताच केला होता. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यासंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. सुरतला गेलेल्या तब्बल तीन आमदारांना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, असे राऊत यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी या कटाची माहिती दिली. एका आमदाराला इंजेक्शन देऊन, तर दुसऱ्याच्या अंगावर थेट ट्रक घालून त्यांना संपवण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. यात त्यांनी प्रामुख्याने अकोल्याचे आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांच्या नावांचा उल्लेख करत महाराष्ट्राच्या राजकारणातील ही अत्यंत धक्कादायक बाब असल्याचे स्पष्ट केले.

राऊत यांच्या दाव्यानुसार, सध्या मंत्री असलेले प्रकाश आबिटकर यांनीही सुरुवातीला सुरतहून परत येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना तिथेच अडकवून ठेवण्यात आले. दुसरीकडे, नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका यावा, अशा प्रकारचे उपचार करून त्यांना मुद्दाम इंजेक्शन देण्यात आले होते. हा त्यांना मारण्याचाच डाव होता, मात्र देशमुख यांनी तिथून संघर्ष करत पळ काढला.

तसेच, कैलास पाटील सुरतहून पळून जात असताना त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. जिवाला अपाय होण्याची शक्यता असतानाही ते काही मैल पायी चालत सुखरूप परतले, असे राऊत म्हणाले. आपल्याकडे ही तीन उदाहरणे असून, शिरसाट यांनीही अप्रत्यक्षपणे हेच सांगितल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. या व्यतिरिक्त इतर आमदारांना तिथे जबरदस्तीने कोंडून ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही