प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता, दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५,००० रुपयांची अग्रीम मदत जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काल सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
राज्य सरकारच्या आढावा बैठकीत दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेत, राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढवून ती ३०५ करण्यात आली आहे. सरकारी प्रक्रियेनुसार केंद्र सरकारची मदत मिळण्यासाठी डिसेंबर महिना उजाडण्याची शक्यता असल्याने, सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना तातडीने आधार देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व ३०५ तालुक्यातील शेतकऱ्यांना या अग्रीम मदत निधीचा लाभ मिळणार आहे.
या मदतीसाठी शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. डीबीटीच्या (DBT) माध्यमातून ही ५ हजार रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. सरकारकडे कर्जमाफीच्या वेळचा मोठा डेटाबेस उपलब्ध असल्याने यासाठी कोणतीही अतिरिक्त कागदी प्रक्रिया राबवावी लागणार नाही.
जे शेतकरी आधीपासूनच केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ किंवा महाराष्ट्र सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. सरकार जुन्या डेटाबेसच्या आधारेच त्यांच्या खात्यात ही रक्कम पाठवणार आहे.
ज्यांची नावे महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर समाविष्ट नाहीत, ते शेतकरी राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नव्याने नाव नोंदवू शकतात. यासाठी आधार कार्ड क्रमांक, सातबारा, ८-अ उतारा आणि आधारशी लिंक असलेले चालू बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच, मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणेही अनिवार्य आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- कसोटीत पुनरागमनावर झालेल्या टीकेला निक मॅडिन्सनचे सडेतोड उत्तर
- पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जिल्ह्यात २० टक्के पाणीकपातीचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
- अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची FRRO ची नोटीस; उच्च न्यायालयात घेतली धाव
Quick Answers
राज्य सरकारने दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५,००० रुपयांची अग्रीम मदत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचा लाभ राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
जे शेतकरी आधीपासूनच 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' किंवा 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
नव्याने नाव नोंदवण्यासाठी आधार कार्ड क्रमांक, सातबारा, ८-अ उतारा, आधारशी लिंक असलेले चालू बँक खाते आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








