Share

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

Published On: 

MPSC Protest Pune Vivek Bhimanwar sent on compulsory leave

प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यात गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार (MPSC Vivek Bhimanwar) यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत भीमनवार हे अध्यक्षपदावर नसणार आहेत.

सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एस. एम. जोशी पुलावर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली. तसेच, या प्रकरणाच्या चौकशी समितीच्या सचिवपदी धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची मोठी माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिवेंद्रराजे यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. शिवेंद्रराजे यांनी सरकारच्या निर्णयाचा मसुदा रोहित पवार यांच्याकडे सोपवला होता. मात्र, त्यात भीमनवार यांच्या राजीनाम्याचा उल्लेख नसल्याने विद्यार्थी आणि पवार यांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली. त्यानंतर सरकारने भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी तत्त्वतः आंदोलन स्थगित केले आहे.

विवेक भीमनवार नेमकं काय म्हणाले? 

एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल असं भीमनवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केल्याने आपण रजेवर जात असल्याचे विवेक भीमनवार यांनी X पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे. आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले असून चौकशी संपेपर्यंत पदावर न राहता रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थी हित हेच माझे प्राधान्य राहील, असे भीमनवार यांनी म्हटले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही