डिलिमिटेशन विधेयकामुळे नवा संघर्ष सुरू होणार; प्रकाश आंबेडकरांचा इशारा, राम माधव यांच्या दौऱ्यावरही उपस्थित केले प्रश्न

डिलिमिटेशन विधेयकावरून प्रकाश आंबेडकर यांनी नव्या संघर्षाचा इशारा दिला आहे. तसेच चीनचे अतिक्रमण आणि राम माधव यांच्या कोलंबो दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Published On: 

Prakash Ambedkar commenting on Delimitation Bill and China encroachment

प्रतिनिधी, २८ नोव्हेंबर: संसदेत एप्रिल महिन्यात मंजूर न होऊ शकलेले डिलिमिटेशन विधेयक आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा आणले जात आहे. या विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली असून, आता संसदेत त्याची परीक्षा होणार आहे. या डिलिमिटेशन विधेयकामुळे नव्या संघर्षाला सुरुवात होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सशर्त पाठिंबा दिला आहे. यावरून इंडिया आघाडीतच फूट पडली असून काँग्रेस नेते राहुल गांधी एकटे पडले आहेत. या राजकीय पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आंबेडकर यांनी यावेळी दोन महत्त्वाच्या घटनांवर भाष्य केले. चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये २०० किलोमीटरपर्यंत अतिक्रमण केले आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर सेव्हन सिस्टर्सच्या भागात त्यांच्याकडून वीजनिर्मिती केली जाणार आहे. पुढे ही नदी भारतात येत असल्याने, चीनकडून भारताचे पाणी अडवले जाईल आणि पाण्यासाठी चीनला साथ देण्याची अट ठेवली जाईल, अशी परिस्थिती असल्याचे आंबेडकर म्हणाले.

त्याचबरोबर, जून-जुलै महिन्यात कोलंबो येथे झालेल्या एका परिषदेचा उल्लेखही त्यांनी केला. या परिषदेला पाकिस्तान, म्यानमारसह इतर देशांचे धोरणात्मक क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी उपस्थित होते. यात पाकिस्तानचे अली खान यांच्यासह सर्वाधिक प्रतिनिधी होते. भारताचे जनरल मनोज मुकुंद नरवणे हेदेखील तेथे उपस्थित होते. मात्र, सरकारशी कोणताही संबंध नसलेले राम माधव तिथे कोणत्या अधिकारात गेले होते? असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा करण्याची मागणी केली आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही