Share

केंद्र सरकार हे हिटलरशाहीचं, देशात गृहयुद्धाची परिस्थिती; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत, सरकारच्या आडमुठ्या धोरणांमुळे देशात गृहयुद्ध भडकू शकते असा गंभीर इशारा दिला आहे.

Published On: 

Prakash Ambedkar on Shivsena symbol case

प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. देशात सध्या हिटलरशाहीचे सरकार सत्तेवर असून, त्यांच्या या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे देशात गृहयुद्धाची (सिव्हिल वॉर) परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.

“हे जे सरकार आहे, हे हिटलरशाहीचं सरकार आहे. या सरकारमध्ये आम्ही चुकतो किंवा आम्ही कोणाशी चर्चा केली पाहिजे अशी वृत्ती नाहीये,” असा घणाघात आंबेडकरांनी केला. ज्ञानेश कुमार यांच्या कारवाईचा संदर्भ देत ते म्हणाले की, सरकारने आपल्या चुका मान्य करण्याची तयारी ठेवली, तरच देशातील लोकशाही टिकेल. हुकूमशाहीची हीच वृत्ती कायम राहिल्यास देशात गृहयुद्ध होताना दिसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा नागरिकांचा संविधानिक अधिकार आहे, मात्र हे शासन तो अधिकारच हिरावून घ्यायला निघाले असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्याची परिस्थिती पाहता शासनालाच गृहयुद्ध हवे आहे असे दिसते, असे सांगत आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) सरकारला “हे आंदोलन शांततेने पार पडू द्या, लोकांचं म्हणणं ऐकायची तयारी ठेवा,” असे आवाहन केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही