Share

अमरावती हादरलं! आई खोटं बोलत असल्याच्या संतापातून इंजिनिअर मुलाने घेतला जन्मदातीचा बळी

अमरावतीत आई खोटं बोलत असल्याच्या रागातून इंजिनिअर मुलाने जन्मदात्या आईची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर आरोपी मृतदेहाशेजारीच बसून होता.

Published On: 

Violent clash between two groups in Majalgaon Beed

अमरावती, 12 ऑक्टोबर: अमरावती शहरात एक अत्यंत खळबळजनक घटना (Amravati Crime) उघडकीस आली आहे. आई खोटं बोलत असल्याच्या रागातून एका इंजिनिअर मुलाने आपल्या ६५ वर्षीय जन्मदात्या आईची गळा आवळून हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर हा आरोपी मुलगा मृतदेहाशेजारीच एका खुर्चीवर बसून राहिला होता. या प्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

नवसारी रिंग रोड परिसरामध्ये असलेल्या गजानन प्लाझा अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. रंजना सतीश कानफाडे (वय ६५) असे मृत आईचे नाव असून, तुषार सतीश कानफाडे असे या आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तुषार पुण्यातील एका नामांकित कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरीला असून सध्या तो ‘वर्क फ्रॉम होम’अंतर्गत घरीच काम करत होता. या फ्लॅटमध्ये केवळ आई आणि मुलगा हे दोघेच राहत होते. हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही