MPSC अध्यक्ष भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी सरकारने फेटाळली; शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती

एमपीएससी अध्यक्ष भीमनवार यांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांची मागणी राज्य सरकारने फेटाळली आहे. तसेच तुकाराम मुंढे एमपीएससीचे नवे सचिव असतील, अशी घोषणा शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.

Published On: 

MPSC protest Pune Shivendraraje Bhosale statement

प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात (MPSC Protest) एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी महायुती सरकारने फेटाळून लावली आहे. एका बैठकीनंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी यासंदर्भात माहिती दिली.

राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपल्याला येथे पाठवल्याचे सांगत शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रोहित पवारांनी सांगितल्यानुसार मी कोणतेही वेडंवाकडं बोलणार नाही. सध्या आचारसंहिता लागू झाली असून आज आपल्याकडे वेळ कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रश्नावर सर्वांशी चर्चा झाली असून सरकार सकारात्मक निर्णय देत असल्याचे भोसले यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा जो मसुदा सायंकाळी त्यांच्याकडे आला होता, तो आता रोहित पवार यांच्याकडे सोपवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडीत शिवेंद्रराजे भोसले यांनी एक मोठी प्रशासकीय घोषणा केली. त्यानुसार, आता तुकाराम मुंढे हे एमपीएससी आयोगाचे सचिव म्हणून कामकाज पाहणार आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही