पुणे, 14 नोव्हेंबर: पुणे जिल्ह्यातील वाघोजवळील कोलवडी येथे सासरी गेलेल्या जावयाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुनानंतर सासरच्या लोकांनी या घटनेला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तपासात हत्येचा उलगडा झाला असून लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
सुलतान सादिक शेख (वय २४, रा. कोंढवा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे आजेसासरे रहीम महम्मद शेख (वय ६५) आणि सासरे अमर रहीम शेख (वय ४५, दोघे रा. चौफुला, कोलवडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुलतान सासरी कोलवडी येथे गेला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
मारहाणीनंतर सासरच्यांनी सुलतानला रुग्णालयात नेले. त्यावेळी तो दुचाकीवरून पडून जखमी झाल्याचा बनाव त्यांनी रचला. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला. पोलीस तपासात हा दुचाकीचा अपघात नसून मारहाणीतच जावयाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यातूनही हत्येची अशीच एक घटना उघडकीस आली आहे. घरगुती कारणावरून सुनेने गाढ झोपेत असलेल्या ७५ वर्षीय सासूवर कुऱ्हाडीने हल्ला केला. रंभाबाई दत्तू बोरूडे असे या मृत महिलेचे नाव आहे.
कुऱ्हाडीच्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रंभाबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी सून मृणाली नवनाथ बोरूडे (वय ३७) हिला पोलिसांनी अटक केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- डिलिमिटेशन विधेयकासाठी भाजपला राष्ट्रवादीचे १५-१६ खासदार हवेत; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट
- अमेरिकेत सर्व विमान उड्डाणे अचानक ठप्प; ७ हजार विमानांना फटका, हजारो प्रवासी अडकले
- मीही राष्ट्रवादीत काम केलंय, बरंच काही बोलू शकतो; शिंदेसेनेच्या मंत्र्याचा सुनील तटकरेंना सूचक इशारा








