Share

इंडिया ‘अ’ चा ऑस्ट्रेलियावर ४९ धावांनी दणदणीत विजय, मुंबईकर सुर्यांश शेडगेची दमदार खेळी

तिसऱ्या वनडेत इंडिया ‘अ’ ने ऑस्ट्रेलिया ‘अ’ चा ४९ धावांनी पराभव केला. सुर्यांश शेडगे आणि विपराज निगम यांची भागीदारी विजयात निर्णायक ठरली.

Published On: 

India A cricket team players celebrating victory

मुंबई, 12 ऑक्टोबर: इंडिया ‘अ’ संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा ४९ धावांनी पराभव करत दणदणीत विजय नोंदवला. मुंबईचा सुर्यांश शेडगे आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने या सामन्यात पुनरागमन केले. भारताने हा शेवटचा सामना जिंकला असला तरी तीन सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलिया ‘अ’ ने २-१ अशा फरकाने जिंकली.

या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया ‘अ’ ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून सलामीवीर प्रियांश आर्याने ४९ तर प्रभसिमरन सिंगने ३९ धावांची खेळी केली. मात्र त्यानंतर ऋतुराज गायकवाड (३३), देवदत्त पडिक्कल (२) आणि रजत पाटीदार (३) हे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने भारतीय संघाची अवस्था ६ बाद १५९ अशी बिकट झाली होती.

संघ अडचणीत असताना सुर्यांश शेडगे आणि विपराज निगम यांनी मोर्चा सांभाळत संघाचा डाव सावरला. सुर्यांशने ६० चेंडूत ६६ धावा ठोकल्या, तर विपराजने ४४ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ७७ चेंडूत ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यामुळे भारतीय संघाला ४७.३ षटकांत सर्वबाद २७५ धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून सदरलँड आणि ड्वारशुईस यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

भारताने दिलेल्या २७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने मजबूत सुरुवात केली. जॉश फिलिप्सने ५६ धावा केल्या, तर नॅथन मॅकस्विनी (३९), लाचलान शॉ (३१) आणि लियाम स्कॉट (२६) यांनी चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३ बाद १७७ अशी भक्कम होती, मात्र भारतीय गोलंदाजांनी सामन्याचे चित्र पालटले. गुरजपनीत सिंगने ३, तर यश ठाकूर आणि निशांत सिंधूने प्रत्येकी २ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने अवघ्या ४९ धावांत शेवटच्या ७ विकेट्स गमावल्या आणि त्यांचा संपूर्ण संघ ४६.२ षटकांत २२६ धावांवर गारद झाला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही