नातेवाईकाच्या लग्नात एकत्र वावरले, अन् काही तासांतच पत्नीची झोपेत दगडाने ठेचून हत्या; बीडमधील धक्कादायक घटना

बीडच्या आनंदवाडीत अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या ५५ वर्षीय पत्नीची पतीने डोक्यात दगड घालून हत्या केली. रविवारी लग्नात एकत्र असलेल्या पतीने पहाटे हे कृत्य केले.

Published On: 

Violent clash between two groups in Majalgaon Beed

बीड, 18 नोव्हेंबर: बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातील तिंतरवणी ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आनंदवाडी येथे एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या ५५ वर्षीय पत्नीची पतीनेच डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर संशयित पती घटनास्थळावरून पसार झाला असून, चकलांबा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवराबाई विष्णू कदम (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे, तर विष्णू गणपत कदम (रा. आनंदवाडी) असे फरार आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधांवरून गेल्या वर्षभरापासून या पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. त्यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकी उडत असत. रविवारी रात्री मात्र हा वाद अधिकच विकोपाला गेला.

विशेष म्हणजे, हत्येच्या अगोदर रविवारी एका नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यात हे दोघेही दिवसभर एकत्र वावरत होते. त्यावेळी दोघांमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र होते. मात्र, सोमवारी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास भिवराबाई घरात गाढ झोपेत असताना विष्णूने घराच्या मागच्या दरवाजाने आत प्रवेश केला आणि झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात मोठा दगड घातला.

अचानक झालेल्या या आवाजामुळे घरातील इतर सदस्यांना जाग आली. त्यांनी पाहणी केली असता भिवराबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, फरार पतीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही