बीड, 1 नोव्हेंबर: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. वाल्मीकचा मुलगा सुशील कराड (Sushil Karad) याच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मारहाण आणि संपत्ती बळकावल्याप्रकरणी सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना २०२४ मध्ये घडली होती. या प्रकरणात सुशील कराड याच्यासह अनिल मुंडे आणि गोपी गंजे यांना संशयित आरोपी करण्यात आले आहे. या तिघांनी एका महिलेच्या घरात घुसून संबंधित महिला, तिचे पती आणि अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच, आरोपींनी पिस्तूल आणि बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी केवळ मारहाणच केली नाही, तर पीडित कुटुंबाला धमकावून त्यांच्या नावावर असलेला प्लॉट आणि सोने स्वतःच्या ताब्यात घेतले. यासोबतच कुटुंबाच्या मालकीची ६ वाहनेही बळजबरीने हिरावून घेतली. या घटनेनंतर सातत्याने धमक्या येत असल्याने, न्याय मिळवण्यासाठी पीडित कुटुंबाने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, सोलापूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यासह एकूण १४ विविध कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि घटनास्थळ लक्षात घेऊन सोलापूर पोलिसांनी पुढील तपासासाठी हा गुन्हा परळी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.
वाल्मीक कराड आधीच सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला सामोरे जात असताना, आता मुलावर आणि त्याच्या साथीदारांवरही गंभीर गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- कोण आहेत निधी राझदान? मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांशी विवाह केल्याने आल्या चर्चेत
- दारूच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये अतिरिक्त आकारणार; रिकामी बाटली दिल्यास मिळणार परतावा
- बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीनंतरची WTC गुणतालिका: वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून विजय
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








