प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या २०२६ च्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे वेस्ट इंडिजला आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC Points Table) २०२५-२७ चक्रात १२ महत्त्वपूर्ण गुण मिळाले आहेत. तर दुसरीकडे, या सामन्यातून बांगलादेशला एकही गुण मिळवता आला नाही.
या विजयामुळे वेस्ट इंडिजच्या एकूण गुणांची संख्या ४२ वरून ५४ झाली असून त्यांची विजयाची टक्केवारी ३२.१४ वर पोहोचली आहे. तरीही ते गुणतालिकेत आठव्या स्थानावरच आहेत. पराभवानंतरही बांगलादेश ४० गुणांसह पाचव्या स्थानावर कायम आहे, मात्र त्यांच्या टक्केवारीत घसरण झाली आहे. या तालिकेत ऑस्ट्रेलिया १०८ गुणांसह (७५ टक्के) अव्वल स्थानावर असून न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पहिल्या डावात २७२ धावा केल्या होत्या. यात शादमन इस्लामने २३४ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने संयमी १०५ धावांची खेळी केली. तौहीद हृदयने ८६ चेंडूत ४२ आणि लिटन दासने ८८ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकनने २३.४ षटकांत ५३ धावा देत सर्वाधिक ५ बळी घेतले. जोशुआ बिशप आणि शमार जोसेफ यांना प्रत्येकी २, तर जेडन सील्सला १ बळी मिळाला.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४५ धावांवर संपुष्टात आला, ज्यामुळे बांगलादेशला २७ धावांची आघाडी मिळाली होती. वेस्ट इंडिजकडून टॅगेनरीन चंद्रपॉलने १८४ चेंडूत ५६, जॉन कॅम्पबेलने ७८ चेंडूत ५४ आणि जस्टिन ग्रीव्ह्जने १०३ चेंडूत ४६ धावा केल्या. कर्णधार रोस्टन चेस ६० चेंडूत ४३ धावांवर नाबाद राहिला.
मात्र, दुसऱ्या डावात बांगलादेशची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. त्यांचा संपूर्ण संघ ४८.४ षटकांत अवघ्या १४२ धावांत गारद झाला. नईम हसनने ९१ चेंडूत ४ चौकारांसह सर्वाधिक ५२ धावा केल्या. झाकर अलीने २२ आणि शादमन इस्लामने १३ धावा केल्या, तर इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने ५ आणि वॉरिकनने ४ बळी घेत बांगलादेशला स्वस्तात गुंडाळले. शमार जोसेफला १ बळी मिळाला.
बांगलादेशने दिलेले १७० धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने ३५.१ षटकांत केवळ २ गडी गमावून सहज पूर्ण केले. ब्रँडन किंगने ११५ चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ८१ धावांची मॅचविनिंग खेळी केली. त्याला जॉन कॅम्पबेलने ५५ चेंडूत ४९ धावा करत चांगली साथ दिली. तर, कवीम हॉज २७ चेंडूत ३१ धावांवर नाबाद राहिला आणि संघाने ८ गडी राखून विजय निश्चित केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- रवींद्र धंगेकरांची नवनाथ बन यांच्यावर वादग्रस्त पोस्ट; ‘कधी तुझी नसबंदी होईल…’, महायुतीत शाब्दिक वाद शिगेला
- शाह, योगी नव्हे, पुढचा पंतप्रधान या राज्यातून? उपराष्ट्रपतींच्या थेट विधानाने मोठी खळबळ
- लाडक्या बहिणींची दिवाळी गोड; सणासुदीच्या तोंडावर सप्टेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








