रवींद्र धंगेकरांची नवनाथ बन यांच्यावर वादग्रस्त पोस्ट; ‘कधी तुझी नसबंदी होईल…’, महायुतीत शाब्दिक वाद शिगेला

विधान परिषद निकालानंतर महायुतीत अंतर्गत वाद चिघळला असून, रवींद्र धंगेकर यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त आणि शेलक्या शब्दांत पोस्ट केली आहे.

Published On: 

Ravindra Dhangekar controversial post on Navnath Ban

प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीत अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची लढाई सुरू झाली असून, भाजप प्रवक्ते नवनाथ बन आणि शिंदे सेना असा हा शाब्दिक सामना रंगला आहे. आधी निलेश राणे यांनी बन यांची लायकी काढल्यानंतर, आता पुणे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी नवनाथ बन यांच्याविषयी एक अत्यंत खालच्या पातळीवर जाणारी वादग्रस्त पोस्ट केली आहे.

रवींद्र धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एका कार्टूनचा वापर केला आहे. या चित्राच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यालय आणि कमळ हे चिन्ह दिसत असून, एक नेता दारात कुत्र्याला पाव खाऊ घालत असल्याचे यात दाखवले आहे. या चित्रासोबत धंगेकरांनी, “ही याची लायकी आणि चालला धंगेकरांशी पंगा घ्यायला चालला….!!” असा उल्लेख केला आहे.

या पोस्टमध्ये पुढे थेट इशारा देताना धंगेकरांनी लिहिले आहे की, “अरे बेट्या तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाही आमच्या, कधी तुझी नसबंदी होईल कळणार सुद्धा नाही तुला.” तसेच या मजकुरासोबत त्यांनी #बनश्वान, #चिल्ला_पुकार आणि #Paid_Animal या हॅशटॅगचाही वापर केला आहे.

तत्पूर्वी, आज सकाळीच भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी धंगेकरांवर जोरदार टीका केली होती. “देवेंद्रजींवर टीका करण्याआधी आत्मपरीक्षण करावे. बारा पक्ष फिरून आलेल्या माकड छापावर मी नाही, पुष्कर तुळजापूरकर बोलतील,” असे बन म्हणाले होते. तसेच, स्वतःला डायनासोर म्हटले जात असल्याचा संदर्भ देत, तो एक बलवान प्राणी असल्याचे त्यांनी नमूद केले. फडणवीसांवर टीका करण्याची धंगेकरांची लायकी नसून, देवा भाऊंकडे बोट दाखवल्यास तसेच उत्तर मिळेल, असा इशारा त्यांनी दिला होता.

एकनाथ शिंदे यांना उद्देशून नवनाथ बन यांनी विनंती केली की, जर तुमची लोकं अशी टीका करत असतील, तर आम्हीही तसेच उत्तर देऊ. महाराष्ट्रात फिरू न देण्याच्या धंगेकरांच्या धमकीचा समाचार घेताना ते म्हणाले, “धमकी कोणाला देता, महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या बापाचा आहे का? भविष्यात काय होईल हे नक्कीच सांगता येणार नाही.”

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही