प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: एका व्यंगचित्राच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या नेत्यांमध्ये बंद दाराआड बैठक झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, या सर्व तर्कवितर्कांना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला असून, त्या कथित बैठकीचा नेमका घटनाक्रम स्पष्ट केला आहे.
‘हास्यरेषा’ या व्यंगचित्रकारांवरील पुस्तकाच्या कार्यक्रमासाठी आपण तिघेही साहित्यप्रेमी म्हणून एकत्र आलो होतो, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले. तिथे भाषणे हास्यविनोद फुलवणारी होती. अशा कार्यक्रमात एकत्र येण्याचा कोणताही राजकीय अर्थ नाही. तिथे कोणतीही राजकीय चर्चा किंवा बंद खोलीतील बैठक झाली नाही. व्यंगचित्रकारासोबत आम्ही सर्वजण एकाच खोलीत बसलो होतो, त्यामुळे या भेटीचे कोणतेही वेगळे राजकीय अन्वयार्थ कुणीही काढू नयेत, असे त्यांनी सांगितले.
याच कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ई-वाहनांबाबत (EV) महत्त्वाची माहिती दिली. प्रदूषणमुक्त भारतासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पुणे आणि नागपूर महानगरपालिकेला सध्या इलेक्ट्रिक बसेसची मोठी आवश्यकता असून, ईका कंपनी ही गरज नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पिनाकेल कंपनीला त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटची क्षमता वाढवण्यास सांगितले असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. येत्या ३ ते ४ वर्षांत महाराष्ट्राला ५० हजार इलेक्ट्रिक बसेसची गरज भासणार आहे. ऑटोमोबाईल हब असलेल्या पुण्यात आता चाकण येथे ई-वाहनांची निर्मिती होणार असून, सरकारकडे यासाठी अनेक योजना आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ईव्हीचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात पीएमपीसाठी इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय २०१५ मध्येच झाला होता, याची आठवण त्यांनी करून दिली. ‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत राज्यात ही सुरुवात होत असून, आज जगात मोबिलिटीसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक वाव असल्याचे फडणवीस म्हणाले. या उद्योगात ५० टक्के महिलांचा सहभाग असून, यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून पंतप्रधानांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल. तसेच, सध्याचे सहा युनिट्स भविष्यात साठपर्यंत जातील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- स्मृती मंधानाचा खुलासा: वर्ल्ड कप विजयानंतर धोनीने पाठवला होता खास व्हॉट्सॲप मेसेज
- शेतकऱ्यांबाबतच्या विधानावरून एकनाथ शिंदे संतापले; आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
- “तुझी लायकी किती तू बोलतो किती!” नवनाथ बन यांच्या आरोपांनंतर निलेश राणे आक्रमक; महायुतीत वाद
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







