दादर, 30 ऑक्टोबर: ‘प्रत्येक व्यक्तीत एखादी कला असते. ज्याला ज्याच्यात गती आहे, त्याने आपल्या क्षेत्रात उत्तम काम केले पाहिजे. मला केवळ राजकारणच समजतं, म्हणून मी राजकारणातच काम करतो. राज ठाकरे हे चांगले व्यंगचित्रकार आहेत, तर उद्धव ठाकरे चांगले छायाचित्रकार आहेत. त्यामुळे या दोघांनी मला राजकारणात चांगले काम करू दिले पाहिजे,’ अशी मिश्किल टिप्पणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या आणि ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा होता. या पुस्तकातून मराठी व्यंगचित्रकलेचा शंभर वर्षांचा प्रवास उलगडण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, अशी सूचना राज ठाकरे यांनीच केली होती. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहता आल्याचे सांगत फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे विशेष आभार मानले.
एकाच मंचावर एकत्र येण्याच्या या प्रसंगावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण या कार्यक्रमाला येणार की नाही, याचे लोकांना आश्चर्य वाटत होते. मात्र, आपण एका मंचावर एकत्र येणे ही महाराष्ट्राची परंपरा असल्याने या निमंत्रणाचे आपल्याला अजिबात आश्चर्य वाटले नाही. तसेच, या कार्यक्रमाला जावे की नाही, असा विचारही आपल्या मनात कधी आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात आजही संवाद टिकून असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी दक्षिणेकडील राजकारणाशी तुलना केली. ‘दक्षिणेत खून के प्यासे असे चित्र दिसते. मात्र आपल्याकडे आम्ही एकत्र कार्यक्रमाला येऊ शकतो आणि सोबत चहाही पिऊ शकतो,’ असे फडणवीस यांनी नमूद केले.
देशात व्यंगचित्राची कला महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी सर्वाधिक जोपासल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. ७५ व्यंगचित्रांची ओळख पाहायला मिळणे हे समाधानाचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी व्यंगचित्रांसाठी एक स्वतंत्र दालन उभारण्याचे आश्वासन दिले. यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांची मदत घेऊन एक उत्तम दालन तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तसेच आजचे हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे असल्याचे सांगून त्यांनी ग्रंथाली प्रकाशनाचे अभिनंदन केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- वोडका पिऊन किसिंग सीन शूट केला; अभिनेत्री नायरा बॅनर्जीचा धक्कादायक खुलासा
- गोकुळ निवडणुकीत समांतर सभेचा थरार; ‘तेव्हा मी जातीवादी नव्हतो का?’, सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांवर पलटवार
- सणासुदीत भेसळ करणाऱ्यांची खैर नाही; तुकाराम मुंढेंची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा, १९ कोटींचे मसाले जप्त
Quick Answers
राज ठाकरे हे चांगले व्यंगचित्रकार आहेत तर उद्धव ठाकरे चांगले छायाचित्रकार आहेत, त्यामुळे या दोघांनी मला राजकारणात चांगले काम करू दिले पाहिजे, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या आणि ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
दक्षिणेत 'खून के प्यासे' असे चित्र दिसते, मात्र महाराष्ट्रात आम्ही एकत्र कार्यक्रमाला येऊ शकतो आणि सोबत चहाही पिऊ शकतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
व्यंगचित्रांसाठी एक स्वतंत्र दालन उभारण्याचे आश्वासन देत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मदत घेऊन हे उत्तम दालन तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






