प्रतिनिधी, 29 ऑक्टोबर: टेलिव्हिजन आणि ओटीटी विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री नायरा बॅनर्जी हिने ‘वन नाईट स्टँड’ या चित्रपटातील एका इंटिमेट सीनच्या शूटिंगचा धक्कादायक किस्सा शेअर केला आहे. एका मुलाखतीत तिने हा प्रसंग सांगितला असून, हा सीन चित्रित करण्यासाठी आपल्याला वोडकाचे शॉट्स प्यावे लागले होते, असा खुलासा तिने केला आहे.
या चित्रपटातील किसिंग सीनच्या अनुभवाबद्दल बोलताना नायराने (Nyrraa Banerji) सांगितले की, त्यावेळी ती एका रिलेशनशिपमध्ये होती. विशेष म्हणजे, ज्या सह-कलाकारासोबत हा सीन द्यायचा होता, त्याच्याशी तिचे भावासारखे नाते होते. त्यामुळे ती प्रचंड अस्वस्थ झाली होती. त्या काळात सेटवर इंटिमसी कोऑर्डिनेटर नसायचे, केवळ दिग्दर्शकच सीन समजावून सांगायचे. भावनिक जवळीक निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक रिहर्सल केल्या होत्या.
मात्र प्रत्यक्ष एकमेकांच्या जवळ जाण्याची वेळ आली, तेव्हा परिस्थिती बिघडली. नायरा म्हणाली की, ती सेटवरून रडतच पळून गेली. ‘आई, माझा बॉयफ्रेंड मला मारून टाकेल’, असे ती त्यावेळी म्हणाली होती. या प्रसंगानंतर दिग्दर्शकाने तिला वोडकाचे शॉट्स प्यायला दिले आणि त्यानंतरच तिने तो सीन पूर्ण केला. शूटिंगच्या दिवशी तिने तिच्या बॉयफ्रेंडला ‘आय लव्ह यू’ असा मेसेजही केला होता.
या इंटिमेट सीनविषयी कळल्यानंतर बॉयफ्रेंडला थोडा राग आला आणि त्याने थेट नायराच्या आईकडे तक्रार केली. मात्र, या इंडस्ट्रीमध्ये अशा गोष्टी सामान्य असून त्या समजून घेतल्या पाहिजेत, असे तिच्या आईने त्याला समजावले. याच बॉयफ्रेंडमुळे आपण अनेक बोल्ड प्रोजेक्ट्स नाकारल्याचेही तिने या मुलाखतीत नमूद केले. याव्यतिरिक्त, इंटिमेट सीनच्या वेळी प्रोडक्शन हाऊसकडून खोलीत आधीच एक ट्रे ठेवला जातो, ज्यामध्ये च्युइंग गम, परफ्यूम आणि सॅनिटायझर दिले जाते, अशी माहितीही नायराने दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- सणासुदीत भेसळ करणाऱ्यांची खैर नाही; तुकाराम मुंढेंची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा, १९ कोटींचे मसाले जप्त
- प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: एकनाथ शिंदेंनी पोलीस आयुक्तांना फोन करून काय दिले होते निर्देश?
- ‘फेकनाथमध्ये हिंमत असती तर…’ प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संताप
Quick Answers
अभिनेत्री नायरा बॅनर्जीने 'वन नाईट स्टँड' या चित्रपटातील एका इंटिमेट सीनच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे.
त्यावेळी नायरा एका रिलेशनशिपमध्ये होती, तसेच ज्या सह-कलाकारासोबत तो सीन करायचा होता, त्याच्याशी तिचे भावासारखे नाते होते. त्यामुळे ती प्रचंड अस्वस्थ झाली होती.
सेटवरून रडत पळून गेल्यानंतर दिग्दर्शकाने तिला वोडकाचे शॉट्स प्यायला दिले, ज्यानंतर तिने तो सीन पूर्ण केला.
नायराच्या माहितीनुसार, प्रोडक्शन हाऊसकडून खोलीत आधीच ठेवल्या जाणाऱ्या ट्रेमध्ये च्युइंग गम, परफ्यूम आणि सॅनिटायझर दिले जाते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








