प्रतिनिधी, 29 ऑक्टोबर: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, या प्रकरणाशी थेट संबंध असल्याच्या आरोपानंतर शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पद सोडले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचे पत्र पाठवले आहे.
दिवंगत प्रदीप पूर्णेकर हे ठाकरे गटाचे ठाण्यातील स्थानिक पदाधिकारी होते. त्यांच्या हत्येप्रकरणी ठाकरे गटाने केलेल्या खळबळजनक आरोपानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या तपासाचाच एक भाग म्हणून मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. समाजमाध्यमे आणि पक्षपातळीवर सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, तसेच सर्वपक्षीय नेत्यांकडून मुख्य नेते व पालकमंत्री म्हणून आपल्याला वेठीस धरण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे सर्व पाहून मनाला प्रचंड वेदना होत असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले.
ज्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, त्यात नाव जोडून पक्षावर आणि नेतृत्वावर दबाव निर्माण केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपण आजवर पक्षाचे काम निष्ठेने केले असून, आपल्यामुळे नेतृत्वाची बदनामी होऊ नये आणि पक्षाची प्रतिष्ठा जपली जावी, यासाठीच हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय कोणत्याही नाराजीतून घेतलेला नाही, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
मीनाक्षी शिंदे यांच्या या राजीनाम्यामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मीनाक्षी शिंदे यांची बदनामी खपवून घेणार नाही, अशी भूमिका घेत शिंदे गटाचे कार्यकर्ते टेंभी नाक्यावर जमा झाले आहेत. तर दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या राजीनाम्यानंतर आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिसेल तिथं ठोकणार! ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर रुपाली पाटील यांचा सुशील कुलकर्णींना भर चौकात बदडण्याचा इशारा
- ऑडिओ क्लिप प्रकरणात महाविकास आघाडीचा हात असण्याची शक्यता; रामदास आठवले यांचा गंभीर आरोप
- “उद्या यांना मुलं झाली तरी संजय राऊतांचे नाव घेतील”, ऑडिओ क्लिपवरून राऊतांचा भाजपवर घणाघात
Quick Answers
मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
दिवंगत प्रदीप पूर्णेकर हे ठाकरे गटाचे ठाण्यातील स्थानिक पदाधिकारी होते.
ज्या प्रकरणाशी संबंध नाही त्यात नाव जोडून पक्षावर व नेतृत्वावर दबाव आणला जात आहे आणि आपल्यामुळे नेतृत्वाची बदनामी होऊ नये तसेच पक्षाची प्रतिष्ठा जपली जावी, यासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे पाठवला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








