माझी मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही; महायुतीतील वादावर उदय सामंत यांचे नेत्यांना खडे बोल

माझी मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही, असे स्पष्ट करत मंत्री उदय सामंत यांनी रामदास कदम आणि प्रसाद लाड यांच्यातील वादावरून नेत्यांना फटकारले.

Published On: 

Uday Samant speaking at a press conference regarding the political dispute

प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी, “माझी मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही,” असे स्पष्ट केले. ज्यांनी मला आमदार आणि मंत्री केले, त्यांच्या शब्दाबाहेर मी कधीही जाणार नाही. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी मंत्री झालो असून, आपले नेते आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हेच सर्वोच्च पदावर बसले पाहिजेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी रामदास कदम आणि प्रसाद लाड यांच्यातील वादावर भाष्य करत महायुतीतील नेत्यांना कानपिचक्या दिल्या. ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा विषय आता संपला असून, मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत; त्यांचा काही गैरसमज झाला असेल, तर प्रसाद लाड यांनी त्यांच्याशी बोलून तो दूर केला पाहिजे, असा सल्ला सामंत यांनी दिला. आपापसातील वादामुळे महायुतीत तेढ निर्माण होऊ नये. दोन्ही संघटनांमध्ये फूट पाडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर त्याचा विचार व्हावा. आपण भांडून केवळ फूट पाडणाऱ्यांना संधी देत आहोत, असा थेट इशाराही त्यांनी दिला. यातून गैरसमज दूर करण्यासाठी आपण स्वतः एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

५०० कोटींच्या व्यवहाराच्या कथित ऑडिओ क्लिपबाबत बोलताना सामंत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण सकारात्मक घेतले असून, एसआयटी नेमून क्लिपची सायबर आणि फॉरेन्सिक चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप कदाचित ‘एआय’च्या (AI) माध्यमातून बनवलेली असू शकते. तसेच, जरांगे पाटील यांच्या क्लिपचीही चौकशी व्हायला हवी; त्यानंतरच सर्व गोष्टींवर सत्य समोर येईल. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस चौकशीअंती काय भूमिका घेतात आणि त्याची कशी अंमलबजावणी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. जरांगे आणि आमच्यात केवळ तात्विक मतभेद आहेत.

शिवसेना कोणत्याही आरोपांच्या भानगडीत पडलेली नाही आणि भाजपला बदनाम करण्याची आमची कोणतीही भूमिका नाही. भाजपच्या नजरेआड काही चालले असेल, तर तो चिंतेचा विषय आहे. प्रत्येकाच्या स्टेटमेंटला उत्तर देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते, असा टोला त्यांनी नितेश राणे यांचे नाव घेत लगावला. तसेच शिंदे आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

उदय सामंत यांनी आपली मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. तसेच एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आपण मंत्री झालो असून, आपले नेते आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हेच सर्वोच्च पदावर बसले पाहिजेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही