फडणवीसांनी साथ दिली नसती तर शिंदेंचा जीव धोक्यात आला असता; रामदास कदमांच्या आरोपांवर नितेश राणेंचा पलटवार

जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील क्लिपनंतर रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मोठा दावा केला आहे.

Published On: 

Nitesh Rane on Ganeshotsav

प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपनंतर महायुतीत मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांना आता मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली नसती, तर एकनाथ शिंदे यांचा जीव धोक्यात आला असता, असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. जरांगे पाटील यांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले आणि ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत देण्यात आले, असा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला होता. यावरून वातावरण तापल्यानंतर रामदास कदम यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता.

भाजपला एकनाथ शिंदे यांची भीती वाटत आहे का? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांना संपवण्याची सुपारी भाजपमधून कोणी घेतली आहे का, अशी विचारणा कदम यांनी केली होती. एकनाथ शिंदे विश्वासाने भाजपसोबत आले. मात्र भाजपचा प्लॅन कसा चालतो, पक्षाकडून पैसे न देता परस्पर दिले जातात आणि यात प्रवीण दरेकर यांचेही नाव आले आहे. भाजपने याचे उत्तर द्यावे, असे रामदास कदम म्हणाले होते.

या आरोपांवर तीव्र आक्षेप घेत नितेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. रामदास कदम हे स्वतःच्या मनाने बोलत आहेत की याला एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची मान्यता आहे? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे महायुतीत फूट पडून विरोधकांना आनंद होईल. त्यामुळे कदम यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. दुसरीकडे, भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनीही याच मुद्द्यावरून रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही