प्रतिनिधी, 25 ऑक्टोबर: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या हवामानात (Weather Update) मोठे बदल पाहायला मिळत आहेत. ऑक्टोबर हिटच्या तडाख्यानंतर आता दिवसा कडक ऊन आणि मध्यरात्रीपासून हलका गारवा असे दुहेरी वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने २५ ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
या चारही जिल्ह्यांमध्ये नागरिकांना उकाड्याचा तीव्र त्रास जाणवू शकतो. दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, याच हवामान अंदाजात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक (घाटमाथ्यासह) आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये २५ ऑक्टोबरला पावसाची कोणतीही शक्यता नसून वातावरण कोरडे राहील. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह त्यांच्या घाटमाथा परिसरातही पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नसून सर्वत्र कोरडे वातावरण राहील.
एकंदरीत २५ ऑक्टोबर रोजी राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. परंतु, काही भागांतील वाढता उकाडा आणि दिवसाचे ऊन व रात्रीचा गारवा यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑगस्टपासून सोन्याच्या दरात तब्बल २३ हजारांची घसरण; चांदीही ५६ हजारांनी स्वस्त
- शेअर बाजाराच्या टिप्स देणारे व्हॉट्सॲप ग्रुप्स ठरताहेत धोक्याचे! SEBI चा गुंतवणूकदारांना गंभीर इशारा
- म्हाडाच्या ८१४ सदनिका आणि भूखंड हडप प्रकरण; २३ बिल्डरांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
Quick Answers
हवामान विभागाने २५ ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तवत 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे, तसेच तेथे हवामान कोरडे राहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही इशारा नसून वातावरण कोरडे राहील.
काही भागांतील वाढता उकाडा आणि दिवसाचे कडक ऊन व रात्रीचा गारवा या दुहेरी वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, म्हणून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







