प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपशी संबंधित व्यक्तीची एक ऑडिओ क्लिप उघड केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे (Manoj Jarange) यांना ५०० कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या गंभीर आरोपानंतर जरांगे पाटील दररोज पत्रकार परिषदा घेत असून, त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच जाब विचारला आहे. मात्र, ज्यांच्या माध्यमातून हा व्यवहार झाल्याचा दावा केला जात आहे, ते श्रीकांत शिंदे या संपूर्ण प्रकरणावर अद्यापही मौन बाळगून आहेत. त्यांनी एकदाही समोर येऊन आपली भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेले श्रीकांत शिंदे कधी बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे श्रीकांत शिंदे आणि मराठा नेता म्हणून उदयाला आलेल्या एकनाथ शिंदे यांच्याही प्रतिमेला धक्का पोहोचल्याचे बोलले जात आहे. आपल्या सर्वोच्च नेत्यावर असे आरोप झाल्याने रामदास कदम यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. या क्लिपमागे अप्रत्यक्षपणे भाजपला जबाबदार धरत, भाजपने ‘केसाने गळा कापण्याचा प्रयत्न’ केल्याचा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला होता. यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
शिवसेनेकडून होत असलेल्या थेट आरोपांनंतर आता भाजप नेत्यांनीही आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांच्यावर जोरदार पलटवार केला. कदम यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने बेजबाबदारपणे वागणे चुकीचे असल्याचे दरेकर म्हणाले. ‘पडद्याआड राहून जरांगे यांना ताकद देणारे कोण होते आणि देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्यासाठी कोण-कोण होते, हेसुद्धा लवकरच समोर येईल’, असा थेट इशारा त्यांनी दिला. तसेच भाजपला विनाकारण दोष दिल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी ताकीदही दरेकर यांनी दिली.
रामदास कदम, उदय सामंत आणि प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे नेते एकाच सुरात बोलत असून, भाजपला बदनाम करण्याचा हा एखादा रणनीतीचा भाग आहे का, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, भाजप नेते प्रसाद लाड यांनीही शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ‘तुम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाबद्दल पाठीमागे काय बोलता, याच्या क्लिप्स जर आम्ही बाहेर काढल्या तर तुम्हाला खूप अवघड जाईल’, असा इशारा लाड यांनी दिला आहे. जरांगे यांच्या या ऑडिओ क्लिपमुळे सध्या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली असून, सातत्याने एकमेकांवर आरोप आणि कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी साथ दिली नसती तर शिंदेंचा जीव धोक्यात आला असता; रामदास कदमांच्या आरोपांवर नितेश राणेंचा पलटवार
- रामदास कदम आक्रमक नेते, प्रसाद लाडांनी त्यांच्या वयाचा आदर राखावा; ऑडिओ क्लिप वादावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
- भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या हे खपवून घेणार नाही; रामदास कदमांच्या टीकेवर दरेकरांचा पलटवार
Quick Answers
मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांना ५०० कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
या क्लिपमागे अप्रत्यक्षपणे भाजपला जबाबदार धरत, भाजपने 'केसाने गळा कापण्याचा प्रयत्न' केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला.
पडद्याआड राहून जरांगे यांना ताकद देणारे आणि देवेंद्र फडणवीसांना बदनाम करणारे कोण होते हे लवकरच समोर येईल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला. तसेच भाजपला विनाकारण दोष दिल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी ताकीदही त्यांनी दिली.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाबद्दल पाठीमागे काय बोलतात, याच्या क्लिप्स बाहेर काढल्या तर खूप अवघड जाईल, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








