प्रतिनिधी, 27 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून वातावरण तापले असतानाच, आता रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare ) यांनी यूट्यूबर सुशील कुलकर्णी यांना अत्यंत आक्रमक शब्दांत थेट इशारा दिला आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी कुलकर्णी यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे यांनी नुकत्याच काही ऑडिओ क्लिप उघड केल्या होत्या. यात जरांगे यांचा जनाधार संपवण्याबाबत आणि ५०० कोटी रुपयांचा उल्लेख होता. यातील आवाज भाजप नेत्यांचा असल्याचा दावा शिंदे गटाच्या काही नेत्यांनी केला होता, मात्र भाजपने याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. याच क्लिपमधील एका संवादात यूट्यूबर सुशील कुलकर्णी यांचा आवाज असल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे.
या दाव्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एका व्हॉट्सॲप स्टेटसचा फोटो शेअर केला आहे. हे स्टेटस सुशील कुलकर्णी यांचे असल्याचे म्हटले जात असून यात ‘प्रवास थांबतोय. निघालो माघारी. सगळ्यांना शुभेच्छा’ असे लिहिलेले दिसत आहे. याच स्टेटसचा आधार घेत ठोंबरे यांनी कुलकर्णी यांना सज्जड दम दिला आहे.
आपल्या पोस्टमध्ये रुपाली पाटील यांनी अतिशय तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “सुशील बापूसाहेब रेणापूरकर उर्फ कुलकर्णी यांनी राजकारणाचा चिखल केलाय राव. पळतोस कुठे हिशोब अपूर्ण राहिलाय..तुला भर चौकात रणरागिणींचा प्रसाद दिल्याशिवाय सुट्टी नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला. तसेच तो अतिशय नीच निघाला असून त्याला दिसेल तिथे ठोकणारच, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सुशील कुलकर्णी यांनी आपली बाजू मांडली आहे. मनोज जरांगे यांच्यासाठीच्या षड्यंत्रकारी बैठकीत आपण उपस्थित नव्हतो, असे स्पष्टीकरण कुलकर्णी यांनी दिले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “उद्या यांना मुलं झाली तरी संजय राऊतांचे नाव घेतील”, ऑडिओ क्लिपवरून राऊतांचा भाजपवर घणाघात
- मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा: कथित क्लिपमधून एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांचाही ‘गेम’ करण्याचा होता डाव
- पाकिस्तानच्या वनडे संघातून सईम अयुब बाहेर; साहिबजादा फरहानला मिळाली संधी
Quick Answers
मनोज जरांगे यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगे यांचा जनाधार संपवण्याबाबत आणि ५०० कोटी रुपयांचा उल्लेख होता.
रुपाली पाटील यांनी, 'पळतोस कुठे हिशोब अपूर्ण राहिलाय..तुला भर चौकात रणरागिणींचा प्रसाद दिल्याशिवाय सुट्टी नाही' असा थेट इशारा दिला तसेच त्याला दिसेल तिथे ठोकणारच, असेही त्या म्हणाल्या.
सुशील कुलकर्णी यांनी आपली बाजू मांडताना, मनोज जरांगे यांच्यासाठीच्या षड्यंत्रकारी बैठकीत आपण उपस्थित नव्हतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








