ऑडिओ क्लिप प्रकरणात महाविकास आघाडीचा हात असण्याची शक्यता; रामदास आठवले यांचा गंभीर आरोप

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपमधून महायुती सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून, यात महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे.

Published On: 

Union Minister Ramdas Athawale recites a humorous poem mocking Uddhav Thackeray at a Mahayuti rally in Worli ahead of BMC elections.

प्रतिनिधी, 26 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपनंतर महायुतीत खळबळ उडाली आहे. या क्लिपच्या प्रसारामागे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हात असण्याची शक्यता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. महायुती सरकारची बदनामी करण्यासाठीच ५०० कोटींच्या आरोपांचे हे षडयंत्र रचले गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये दिल्याचे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. जरांगे यांचे आंदोलन सातत्याने सुरूच आहे, त्यामुळे ते थांबवण्यासाठी पैसे दिल्याची चर्चा निराधार आहे. या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले असून, सारथीसारख्या योजनांसाठी सरकारने निधीही उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समन्वयाने काम करत असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मतदार यादी स्वच्छ करण्यासाठी ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया राबवण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले. यादीतून वगळण्यात आलेल्यांमध्ये मृत आणि स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे. कोणताही नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, हीच आपली भूमिका असून आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करून मतदानाचा हक्क दिला जावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करतानाच, या भागांसाठी केंद्राकडून मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आठवले यांनी दिली. तसेच, ज्ञानेश कुमार हे राजीनामा देणार नाहीत, असे स्पष्ट करत तरुणांनी राजकीय आंदोलनांमध्ये पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

या ऑडिओ क्लिपच्या प्रसारामागे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हात असण्याची शक्यता रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. तसेच महायुती सरकारची बदनामी करण्यासाठीच ५०० कोटींच्या आरोपांचे हे षडयंत्र रचले गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही