बॅलेट पेपर हवा होता, तर राजीव गांधींच्या काळात EVM का आणले? रामदास आठवलेंचा काँग्रेसला सवाल

ईव्हीएमवरून चुकीचा प्रचार थांबवा, बॅलेट पेपर हवा होता तर राजीव गांधींच्या काळात मशीन का आणली? असा थेट सवाल रामदास आठवलेंनी काँग्रेसला केला आहे.

Published On: 

Narendra Modi Is Not a Divine Incarnation - Ramdas Athawale

खेड, 26 ऑक्टोबर: काँग्रेसला जर खरोखरच बॅलेट पेपर हवा होता, तर त्यांनी राजीव गांधी सत्तेत असताना ईव्हीएम का आणले? असा थेट सवाल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विचारला आहे. ईव्हीएमवरून चुकीचा प्रचार करणे थांबवून काँग्रेसनेही बहुमत मिळवून सत्तेत यावे, असा सल्ला त्यांनी दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुका मेळाव्यात ते बोलत होते.

कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जेव्हा काँग्रेसचे सरकार आले, तेव्हा ईव्हीएममधून मते चोरीला गेल्याचा आरोप आम्ही कधीच केला नाही, असे आठवले म्हणाले. ज्या पक्षाला बहुमताचा आकडा मिळतो, त्याला सत्तेत बसण्याचा अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये दिल्याच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले. जरांगे यांचे आंदोलन संपवण्यासाठी भाजपने पैसे दिल्याच्या खोट्या चर्चा सुरू असून, अशा प्रकारे कोणालाही बदनाम करणे योग्य नसल्याचे आठवले म्हणाले. या ऑडिओ क्लिपची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तत्पूर्वी, आपण एकही पैसा घेतला नसून मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करण्याचा हा कट असल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी देत या प्रकरणाच्या निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी केली होती.

संविधान बदलणे इतके सोपे नाही. जे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याचा प्रयत्न करतील, त्यांचा सत्यानाश केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असा इशारा आठवले यांनी दिला. केवळ आंदोलनाच्या माध्यमातून देशाची सत्ता किंवा संविधान बदलता येत नाही. भारतात संविधानाचे राज्य कायम राहील आणि देशाची अवस्था बांगलादेशसारखी होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्यांना सत्तेत यायचे आहे त्यांनी २०२९ च्या निवडणुकीत जनतेसमोर जावे आणि मतपरिवर्तन करून मते मिळवावीत, असा सल्ला आठवले यांनी विरोधकांना दिला. तसेच, गेल्या १२ वर्षांच्या काळात मोदी सरकारने देशाचा संपूर्ण कायापालट केला असल्याचा दावाही त्यांनी या मेळाव्यात केला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

काँग्रेसला जर खरोखरच बॅलेट पेपर हवा होता, तर त्यांनी राजीव गांधी सत्तेत असताना ईव्हीएम का आणले, असा सवाल रामदास आठवले यांनी काँग्रेसला विचारला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही