प्रतिनिधी, 29 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या जातीयवादी प्रचाराच्या आरोपांना आमदार सतेज पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “जेव्हा गोकुळच्या चेअरमनपदासाठी नविद मुश्रीफ यांच्या नावाचे पाकीट दिले होते आणि मुश्रीफ साहेबांना सांगितले होते, तेव्हा मी जातीवादी नव्हतो का?” असा बोचरा सवाल पाटील यांनी विचारला आहे.
विरोधकांना गोकुळ दूध संघ बंद पाडायचा असल्याचा गंभीर आरोप करत सतेज पाटील म्हणाले की, आमच्याकडे बहुमत असल्याचे देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला माहिती आहे. माझा मुलगा चेअरमन होणार नव्हता, तर शेतकऱ्यांसाठी गोकुळ वाचला पाहिजे हीच माझी भूमिका आहे. यावेळी त्यांनी जनक्षोभ निर्माण होईल, असा इशाराही विरोधकांना दिला.
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी २९ ऑक्टोबर रोजी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. महायुतीच्या १२ संचालकांनी दांडी मारल्यामुळे कोरमअभावी निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगले यांनी बैठक तहकूब केली. या निर्णयावर सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त करत याला ‘सहकारातील काळा दिवस’ म्हटले आहे. कोरमचा मुद्दा हा सभेसाठी लागू होतो, निवड प्रक्रियेसाठी नाही, असा दावा त्यांनी केला.
अधिकृत सभा तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीने समांतर सभा घेत बहुमताच्या जोरावर शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली. संचालक अभिजीत तायशेटे यांनी सांगितले की, या समांतर सभेतील निवडीची मागणी आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी चौगले यांनी ही निवड नाकारली आहे. दुसरीकडे, शशिकांत चुयेकर पाटील यांनी ही संपूर्ण निवड प्रक्रिया कायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
प्रशासकांच्या कार्यकाळात गोकुळचे दूध संकलन कमी झाले असून संघाला २४ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला. दुष्काळामुळे भविष्यात दुधाची कमतरता भासणार आहे. त्यामुळे दूध संकलन आणि पावडर निर्मितीबाबत तातडीने निर्णय घ्यावे लागतील, यासाठी कारभार आमच्याकडे सोपवण्याची विनंती करणारे पत्र प्रशासकांना देणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधताना पाटील म्हणाले की, ज्यांनी त्यांच्या मुलाला पाडले आणि त्रास दिला, त्यांच्यावर मुश्रीफ काहीच बोलत नाहीत. कागल, चंदगड, भुदरगड आणि हातकणंगले हे तालुके वगळता इतर सर्व ठिकाणी नविद मुश्रीफ यांना कमी मते पडल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुश्रीफ सत्तेतील नेते असल्याने आव्हान देऊ शकतात, पण लोकांनी निवडून दिलेल्या संचालकांनी सभेला यायला हवे. सलग तीन सभांना उपस्थित न राहिल्यास संचालक पद आपोआप रद्द होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
दरम्यान, अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी कारस्थान रचले जात असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सीएम फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या मुद्यावरून विश्वजित कदम आणि सुप्रिया सुळे यांनीही सडकून टीका केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिसेल तिथं ठोकणार! ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर रुपाली पाटील यांचा सुशील कुलकर्णींना भर चौकात बदडण्याचा इशारा
- ऑडिओ क्लिप प्रकरणात महाविकास आघाडीचा हात असण्याची शक्यता; रामदास आठवले यांचा गंभीर आरोप
- “उद्या यांना मुलं झाली तरी संजय राऊतांचे नाव घेतील”, ऑडिओ क्लिपवरून राऊतांचा भाजपवर घणाघात
Quick Answers
महायुतीच्या १२ संचालकांनी गैरहजर राहिल्यामुळे कोरमअभावी निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगले यांनी ही बैठक तहकूब केली.
अधिकृत सभा तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीने घेतलेल्या समांतर सभेत शशिकांत पाटील चुयेकर यांची बहुमताच्या जोरावर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
गोकुळच्या चेअरमनपदासाठी जेव्हा नविद मुश्रीफ यांच्या नावाचे पाकीट दिले होते आणि मुश्रीफ यांना सांगितले होते, तेव्हा आपण जातीवादी नव्हतो का, असा सवाल सतेज पाटील यांनी विचारला.
प्रशासकांच्या कार्यकाळात गोकुळचे दूध संकलन कमी झाले असून संघाला २४ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







