प्रतिनिधी, 30 ऑक्टोबर: विधानपरिषद निवडणुकीच्या (MLC Election Result 2026) निकालानंतर महायुतीमध्ये निर्माण झालेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. राणे यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत, “नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती”, अशा शब्दांत सुनावले आहे. या टीकेमुळे आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील शाब्दिक चकमक वाढल्याचे चित्र आहे.
राज्यातील पाच जागांवर झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने पदवीधरच्या ३ पैकी ३ जागा जिंकल्या, तर सत्ताधारी महायुतीला केवळ शिक्षकांच्या दोन्ही जागांवर समाधान मानावे लागले. यानंतर पुण्यात भाजप उमेदवाराच्या पराभवाचे खापर नवनाथ बन यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर फोडले होते. शिवसेनेने ‘केसानं गळा कापत’ भाजप उमेदवाराविरोधात प्रचार केल्याचा आरोप करत त्यांनी महायुतीच्या गणिताला सुरुंग लावल्याचा दावा केला होता. तसेच पुरावे दाखवत ‘धंगेकरांवर कारवाई’ करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले होते. बन यांच्या या भूमिकेनंतर शिवसेनेचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा सपाटा लावला आहे.
महायुतीमधील हा अंतर्गत विसंवाद वाढत असल्याचे पाहून एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत त्यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना मित्रपक्षांवर माध्यमांसमोर टीका न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणुकीतील निकालांचे महायुती म्हणून आत्मपरीक्षण करा आणि झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा. युतीत वितुष्ट निर्माण होणार नाही आणि अंतर्गत वादाचा फायदा विरोधकांना मिळणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत.
याशिवाय, महायुती म्हणून काम करताना झालेल्या चुका आणि त्रुटींचा सविस्तर अहवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे. या मुद्द्यांवर महायुतीची समन्वय समिती आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. तूर्तास, विसंवाद टाळून सर्वांनी एकजुटीने पुन्हा कामाला लागावे, असे आदेश शिंदे यांनी दिले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून प्रसिद्ध कृष्णा बाहेर; सिराज आणि नितीश रेड्डीवर नवी जबाबदारी
- आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सकडून मोठी घोषणा; रॉबिन उथप्पाकडे फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी
- पुरेशी झोप घेऊनही फ्रेश वाटत नाही? जीवनशैलीतील ‘या’ सवयी असू शकतात कारणीभूत
Quick Answers
निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, "नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती", अशा शब्दांत सुनावले.
पुण्यात भाजप उमेदवाराच्या पराभवाचे खापर फोडत, शिवसेनेने 'केसानं गळा कापत' भाजप उमेदवाराविरोधात प्रचार केल्याचा आणि महायुतीच्या गणिताला सुरुंग लावल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला होता.
महाविकास आघाडीने पदवीधरच्या ३ पैकी ३ जागा जिंकल्या, तर सत्ताधारी महायुतीला केवळ शिक्षकांच्या २ जागा मिळाल्या.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना मित्रपक्षांवर माध्यमांसमोर टीका न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, तसेच निकालांचे आत्मपरीक्षण करून वादाचा फायदा विरोधकांना मिळणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








