प्रतिनिधी, 30 ऑक्टोबर: आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने (MI) शुक्रवारी (३० ऑक्टोबर) माजी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाची आपला नवा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्यामुळे उथप्पाचे हे पुनरागमन अतिशय विशेष मानले जात आहे.
तब्बल १८ वर्षांनंतर उथप्पा एका नव्या जबाबदारीसह त्याच फ्रँचायझीमध्ये परतला आहे. आगामी २०२७ च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्स आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये अनेक मोठे बदल करत आहे. याच बदलांचा भाग म्हणून माहेला जयवर्धनेच्या जागी कायरन पोलार्डची मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता पुढील हंगामासाठी उथप्पा फलंदाजी प्रशिक्षकाची धुरा सांभाळणार आहे.
दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर २०२८ च्या हंगामासाठी ४ आयपीएल फ्रँचायझींनी गौतम गंभीरशी संपर्क साधला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उथप्पाच्या नियुक्तीबाबत मुंबई इंडियन्सने ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी लिहिले आहे की, “आमच्या अगदी पहिल्या हंगामाचा भाग असण्यापासून ते खूप मोठा अनुभव सोबत घेऊन परतण्यापर्यंत! रॉबीकडे (Robin Uthappa) खेळाची उत्तम जाण, उत्कृष्ट संवादकौशल्य आणि तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची स्पष्टता आहे! पलटनमध्ये तुझे पुन्हा स्वागत आहे, रॉबिन! आपला new Batting Coach.”
📌 महत्वाच्या बातम्या
- मला राजकारणच समजतं, त्यामुळे ठाकरे बंधूंनी मला राजकारणात चांगलं काम करू द्यावं: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० पूर्वी रंगणार IND vs PAK हायव्होल्टेज सामना; कधी, कुठे पाहाल मॅच?
- ‘२०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं’; राज ठाकरेंच्या मिश्किल टोलेबाजीने पिकला हशा
Quick Answers
मुंबई इंडियन्सने माजी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाची आपला नवा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे.
रॉबिन उथप्पा तब्बल १८ वर्षांनंतर एका नव्या जबाबदारीसह मुंबई इंडियन्स फ्रँचायझीमध्ये परतला आहे. तो २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात या संघाचा भाग होता.
माहेला जयवर्धनेच्या जागी कायरन पोलार्डची मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








