न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० पूर्वी रंगणार IND vs PAK हायव्होल्टेज सामना; कधी, कुठे पाहाल मॅच?

क्रिकेट चाहत्यांसाठी ३० ऑक्टोबर २०२६ हा दिवस अत्यंत खास ठरणार आहे. या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचे दोन सामने पाहायला मिळणार आहेत.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 30 ऑक्टोबर: क्रिकेट चाहत्यांसाठी ३० ऑक्टोबर २०२६ हा दिवस अत्यंत खास ठरणार आहे. या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचे दोन सामने पाहायला मिळणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यापूर्वीच, ‘हाँगकाँग सिक्सेस’ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हायव्होल्टेज सामना रंगणार आहे.

हाँगकाँग सिक्सेसच्या २२ व्या पर्वाला ३० ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होत असून ही स्पर्धा १ नोव्हेंबरपर्यंत चालेल. हाँगकाँगच्या मोंग कोक येथील प्रसिद्ध मिशन रोड मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक लढत सकाळी ११.४५ वाजता सुरू होईल. तर त्यानंतर दुपारी १२.३० वाजता ऑकलंडच्या ईडन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी-२० सामना खेळवला जाईल. भारत-पाकिस्तान सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि फॅनकोडवर पाहता येणार आहे.

क्रिकेटच्या या वेगवान आणि अनोख्या प्रकारात प्रत्येक संघाकडून केवळ सहा खेळाडू मैदानात उतरतात आणि एका डावात फक्त सहा षटके असतात. या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले असून त्यांची प्रत्येकी तीन संघांच्या चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान आणि यूएई यांना ‘क’ (Group C) गटात ठेवण्यात आले आहे. प्राथमिक फेरीनंतर बाद फेरी व वर्गीकरणाचे सामने पार पडतील आणि १ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना होईल.

या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. संघात शशांक सिंग, राहुल तेवतिया, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, टी. नटराजन आणि कुलवंत खेजरोलिया यांचा समावेश आहे. दुसरीकडे, गतविजेत्या पाकिस्तान संघाची धुरा अब्बास आफ्रिदीच्या खांद्यावर असून त्यांच्या संघात अब्दुल समद, अहमद दानील, मोहम्मद इरफान खान, ख्वाजा नाफे, मोहम्मद शहजाद आणि साद मसूद हे खेळाडू खेळणार आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

हा सामना ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.४५ वाजता हाँगकाँगच्या मोंग कोक येथील प्रसिद्ध मिशन रोड मैदानावर खेळवला जाईल.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही