विधानपरिषद निकालानंतर रोहिणी खडसेंची बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी; सरकारवर जोरदार टीका

विधानपरिषदेत मविआला यश मिळाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Published On: 

Rohini Khadse criticize Govt Over Raksha Khadse Daughter Molestation Case

प्रतिनिधी, 30 ऑक्टोबर: विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीने ५ पैकी ३ जागा जिंकल्या असून, सरकार बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास घाबरत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यांनी पुन्हा एकदा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे.

माध्यमांशी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, विधान परिषद निवडणुकीतील यश हे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीचे तसेच लोकांनी दाखवलेल्या विश्वासाचे फळ आहे. बॅलेट पेपरवरील निवडणुकांवर आमचा विश्वास असून यात महाविकास आघाडीला यश मिळत आहे. सध्या महायुती सरकारबाबत लोकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना सरकार पाठीशी घालत असून रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीनंतरही दोषींवर कारवाई झालेली नाही. यातूनच पदवीधर मतदारांनी आपला रोष मतदानातून व्यक्त केल्याचे त्या म्हणाल्या.

पक्षाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत माहिती देताना खडसे यांनी राज्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती मांडली. आर्थिक भार सहन होत नसल्याने मुलांचे शिक्षण सुरू ठेवून मोठ्या प्रमाणावर मुलींचे शिक्षण थांबवले जात आहे. ही परिस्थिती पिढ्यानपिढ्या चालत आलेली असून आजही अनेक जिल्ह्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे. या समस्या जाणून घेत त्या सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हा दौरा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. रोजंदारी बुडू नये आणि मासिक पाळीचा त्रास टाळण्यासाठी महिलांची गर्भपिशवी काढली जाणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे त्या म्हणाल्या. यापूर्वी ऊसतोड कामगार महिलांच्या बाबतीतही असे घडले होते. यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि रोजगार जाणाऱ्या महिलांसाठी वेगळी मदत देणारे स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सक्तीच्या कर्जवसुलीला स्थगिती दिलेली आहे. मात्र, तरीही फायनान्स कंपन्या कर्ज भरण्यासाठी महिलांना त्रास देत असतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशारा खडसे यांनी दिला. दबाव आणणाऱ्या कंपन्यांविरोधात महिलांनी तक्रार करावी. तसेच, त्रास होत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षांशी किंवा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, पक्ष त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे आवाहनही रोहिणी खडसे यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने ५ पैकी ३ जागा जिंकल्या आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही