‘२०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं’; राज ठाकरेंच्या मिश्किल टोलेबाजीने पिकला हशा

‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या मिश्किल टिप्पणीने सभागृहात एकच हशा पिकला.

Published On: 

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray and Raj Thackeray sharing a stage at an event

प्रतिनिधी, 30 ऑक्टोबर: ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. मंत्री आशिष शेलार यांच्या एका विधानाचा धागा पकडत राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेल्या एका मिश्किल टिप्पणीमुळे सभागृहात एकच हशा पिकला.

या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातीलाच व्यासपीठावरील मान्यवरांचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी शेलार यांना लक्ष्य केले. ‘मी मुख्यमंत्र्यांना बोलावले की ते येतात, यापुढेही बोलावणार आणि ते येत राहतील,’ असे शेलार यांनी याआधी म्हटले होते. त्यावर राज ठाकरे यांनी, ‘२०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं, अजून मी काय सांगू,’ असा मिश्किल टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांना आपले हसू आवरता आले नाही.

आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देताना राज ठाकरे यांनी सांगितले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना लाडाने ‘टिनू’ म्हणायचे. १९७९ मध्ये त्यांचे पहिले व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. त्याचे शीर्षक ‘आमच्या टिनूनं चितारलेलं उद्याचं चित्र’ असे होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कलेचेही आवर्जून कौतुक केले. उद्धव यांचा उत्तम चित्र काढण्यात आणि ऑईल पेंटिंगमध्ये हातखंडा होता, तर वेडेवाकडे काढण्याचे काम आपल्याकडे होते, असे ते गमतीने म्हणाले.

व्यंगचित्र काढणे ही आपली अत्यंत आवडती गोष्ट होती. मात्र, जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये तीन वर्षे काढल्यानंतर आपण ते सोडून दिल्याचे राज यांनी सांगितले. त्यामुळे आपण पदवीधर नाही, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. तरीही, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराला पदवीधर असण्याची कोणतीही अट नसते, त्यामुळे आपण ती निवडणूक नक्कीच लढवू शकतो. देशाची लोकशाही यासाठीच अस्तित्वात आहे, अशी कोपरखळीही राज ठाकरे यांनी यावेळी मारली.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मंत्री आशिष शेलार यांच्या विधानाचा संदर्भ घेत राज ठाकरे यांनी, '२०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं, अजून मी काय सांगू,' असा मिश्किल टोला लगावला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही