मुंबई, 30 ऑक्टोबर: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या हप्त्याच्या वितरणासाठी ३४४.६२ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे. हा निधी प्राप्त होताच येत्या काही दिवसांत पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
महायुती सरकारने जुलै २०२४ पासून या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली होती. सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेअंतर्गत तब्बल २ कोटी ४७ लाख महिला लाभार्थी होत्या. मात्र, राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केल्यानंतर या संख्येत मोठी घट झाली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आणि ६५ वर्षे वय पूर्ण झालेल्या अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.
ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या आता १ कोटी ६६ लाखांवर आली आहे. लाभार्थी संख्या कमी झाल्यामुळे शासनाचा या योजनेवर होणारा खर्चही कमी झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही योजना कधीही बंद होणार नाही, असे स्पष्ट केले होते.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने काही प्रमुख अटी निश्चित केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. यासोबतच, ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहन आहे किंवा ज्या महिला नोकरी करतात, त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- वोडका पिऊन किसिंग सीन शूट केला; अभिनेत्री नायरा बॅनर्जीचा धक्कादायक खुलासा
- गोकुळ निवडणुकीत समांतर सभेचा थरार; ‘तेव्हा मी जातीवादी नव्हतो का?’, सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांवर पलटवार
- सणासुदीत भेसळ करणाऱ्यांची खैर नाही; तुकाराम मुंढेंची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा, १९ कोटींचे मसाले जप्त
Quick Answers
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी ३४४.६२ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे.
ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या घटून आता १ कोटी ६६ लाखांवर आली आहे.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहन आहे किंवा ज्या महिला नोकरी करतात, त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








