नाशिक, 12 ऑक्टोबर: विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर गावांचा विकास अटळ आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियाना’कडे पाठ फिरवणाऱ्या अधिकाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. ज्या अधिकाऱ्यांचे काम ५० टक्क्यांपेक्षा कमी असेल, त्यांची नावे थेट पुरस्कार वितरण सोहळ्यात जाहीर करून त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे.
ग्रामविकास आणि पंचायतराज विभागातर्फे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’, २०२५-२६ चे पुरस्कार वितरण, २०२६-२७ च्या अभियानाचा शुभारंभ आणि ‘सरपंच परिसंवाद-दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी काही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी या अभियानाकडे दुर्लक्ष करत असल्याची गंभीर तक्रार मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
मंत्री गोरे यांच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी तातडीने व गांभीर्याने दखल घेतली. ‘जे विद्यार्थी परीक्षेला बसायलाच तयार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल’, असे सांगत त्यांनी प्रशासकीय सुस्तपणावर प्रहार केला. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला प्रशासकीय दिरंगाईचे ग्रहण लागू देणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
केवळ कागदपत्रांवर विकास न दाखवता सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी थेट गावपातळीवर मैदानात उतरून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. हे अभियान गावखेड्यांचा कायापालट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- उच्च न्यायालयाच्या आदेशाने साखर कारखान्यांना दिलासा; १४ कारखान्यांचे ऊस गाळप परवाने मंजूर
- जळगावात लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरीचा प्रताप; सासरच्यांना जेवणातून विष देऊन रोकडसह पलायन
- आयपीएलच्या ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाला बहुतांश कर्णधारांचा विरोध होता; अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









