पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; सराव मैदाने मिळणार विनामूल्य

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून, आता सरावासाठी महापालिका आणि नगरपरिषदांची मैदाने विनामूल्य उपलब्ध होणार आहेत.

Published On: 

Police recruitment candidates preparing on ground Maharashtra government decision

प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यभरातील तरुणांसाठी शासनाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापुढे उमेदवारांना मैदानी सरावासाठी महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मैदाने विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याबाबत नगरविकास विभागाने अधिकृत शासन परिपत्रक जारी केले आहे.

नव्या निर्णयानुसार, पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते प्रत्यक्ष मैदानी चाचणी संपेपर्यंत उमेदवारांना ही सुविधा मोफत वापरता येणार आहे. या मैदानांच्या वापरासाठी कोणत्याही प्रकारचे भाडे, वापरशुल्क, प्रवेशशुल्क किंवा अनामत रक्कम आकारता येणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

उमेदवारांच्या सरावासाठी विशेष वेळा निश्चित करण्यात आल्या असून, पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत सरावाला प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय, मैदानांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, कपडे बदलण्यासाठी कक्ष (बदलकक्ष), पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

यापूर्वी काही भागांमध्ये मैदाने वापरताना विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातून पैसे मोजावे लागत होते. राज्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, सरकारच्या या नव्या परिपत्रकामुळे या सर्व उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही