फायनान्स कंपनीच्या महिला अधिकाऱ्याची दंडेली; हप्ता थकल्याने शेतकऱ्याच्या पत्नी, मुलीला विकण्याची भाषा

लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या कर्जाचा २२ हजारांचा हप्ता थकल्याने महिला वसुली अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलीला विकण्याची भाषा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Published On: 

Latur farmer loan recovery abuse viral audio clip

लातूर, 18 नोव्हेंबर: लातूर जिल्ह्यातील खलंगरी येथील एका शेतकऱ्याने घेतलेल्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाचा हप्ता थकल्याने एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्ज वसुलीसाठी एका महिला अधिकाऱ्याने अत्यंत गलिच्छ भाषा वापरत थेट शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलीला विकण्याची भाषा केली आहे. या अर्वाच्च शिवीगाळीची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

खलंगरी गावातील शेतकरी सतीश बोळंगे यांनी दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यातील २२ हजार रुपयांचा हप्ता त्यांना वेळेवर भरता आला नाही. यामुळे संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीच्या महिला रिकव्हरी ऑफिसरने जामीनदाराला फोन करून अत्यंत गलिच्छ शब्दांत शिवीगाळ केली आणि बायका-लेकरांना विकण्याबाबत वक्तव्य केले.

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा स्थितीत फायनान्स कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, या व्हायरल क्लिपमुळे मायक्रो फायनान्स कंपन्या शासनाचे आदेश कसे धाब्यावर बसवत आहेत आणि किती नीच पातळीवर जाऊन वसुली करत आहेत, याचे विदारक सत्य समोर आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही